मराठी बातम्या /बातम्या /पुणे /हा काय कॉमेडी शो आहे का? सुप्रिया सुळेंनी उडवली मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची खिल्ली

हा काय कॉमेडी शो आहे का? सुप्रिया सुळेंनी उडवली मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची खिल्ली

'काल मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं. त्यात महागाई वगैरे बोलतील अशी अपेक्षा. पण टीका आणि अशाच गोष्टी?

'काल मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं. त्यात महागाई वगैरे बोलतील अशी अपेक्षा. पण टीका आणि अशाच गोष्टी?

'काल मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं. त्यात महागाई वगैरे बोलतील अशी अपेक्षा. पण टीका आणि अशाच गोष्टी?

पुणे, 04 मार्च : ' शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अधिवेशनात भाषण झालं. त्यात महागाई वगैरे बोलतील अशी अपेक्षा. पण टीका आणि अशाच गोष्टी? हा काय कॉमेडी शो आहे का? ही राज्याची विधानसभा आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

हांडेवाडीतील सुप्रियाताई लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.

'काल मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं. त्यात महागाई वगैरे बोलतील अशी अपेक्षा. पण टीका आणि अशाच गोष्टी? हा काय कॉमेडी शो आहे का? ही राज्याची विधानसभा आहे. वरून आदेश आल्याशिवाय काही होत नाही. सरकारने ठरवलं की, नाही करायचं तर होतचं नाही, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

('कसबा झाकी है...' संजय राऊतांनी सांगितला 2024 च्या विजयी जागांचा आकडा!)

महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणती गोष्ट मिळालं नाही असं झालं नाही. कोरोना काळात कोणी उपाशी झोपले नाही. इंदापूर तालुक्यातील भांडगावमध्ये दारू बंदी झाली नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिस समोर आंदोलनाला बसणार, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला.

'काल बिचारे संजय राऊत काय म्हणाले ? त्याचा वर इतका बागुलबुवा. तीन तीन वेळा तेच दाखवतात. इतकं वाईट आहे तर दाखवू नका ना, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांची पाठराखण केली.

(Sandeep Deshpande Attack Case : मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरण; घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर, Live Video)

'आता जेवढा अभ्यास केला तेवढा केला असता तर जिल्हाधिकारी होऊन राज्याची मुख्य सचिव असते. एखाद्या कंपनीमध्ये सीईओ असते. पण आई वडिलांनी कधीच अभ्यास कर सांगितलं नाही.आज लग्नाचा वाढदिवस आहे. कंपनीमध्ये असते तर महाबळेश्वरला नक्की गेले असते. आता ट्रेन सुटली, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

First published:
top videos