कोल्हापूर, 04 मार्च : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपला धूळ चारत विजय मिळवला आहे. या दोन्ही मतदारसंघातील निकाल हा धडा आहे. महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी एक मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने काम केलं आहे. 2024 साली विधानसभेत महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. लोकसभेमध्ये 40 जागा निवडून येतील, कसबा झाकी है, महाराष्ट्र बाकी है, असा दावाच खासदार संजय राऊत यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी संजय राऊत यांनी कसबा निवडणुकीवर भाष्य केलं. ‘चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय आहे, हे कुणीच माणणार नाही. हा जगताप पॅटर्नचा विजय आहे. राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. आम्ही त्यांना माघार घ्यायला लावली असती तर निकाल वेगळा आला असता. स्थानिक स्वराज निवडणुकीवर वेगळं गणित असतं. ग्रामपंचायत निवडणुका या वेगळ्या असता. एखादा घटक पक्ष बाजूला गेला तर काय होऊ शकतं हे चिंचवडच्या निकालावरून दिसून येतंय’ असं म्हणत राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना वंचितला सोबत घेण्याचा सल्ला दिला. (Sandeep Deshpande Attack Case : मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरण; घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर, Live Video) ‘दोन्ही निवडणुकीने धडे दिले आहे. महाविकास आघाडी एकत्र राहिलो तर कसबाचा निकाल लागतो आणि वेगळो लढलो तर चिंचवड पोटनिवडणुकीसारखा निकाल लागतो. हा दोन्ही मतदारसंघातील निकाल हा धडा आहे. महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी एक मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने काम केलं आहे. 2024 साली विधानसभेत महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. लोकसभेमध्ये 40 जागा निवडून येतील’ असा दावाही राऊतांनी केला. (शिंदे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सरळ सेवा भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ) ‘मी विधिमंडळला असं बोलायला वेडा नाही, माझा वक्तव्य फक्त एका व्यक्ती पुरते होते. मला आलेली नोटीस मी वाचली नाही. मी दौऱ्यावर आहे. नोटीस वाचून ठरवेन काय करायचे ते’ असंही राऊत म्हणाले. संदीप देशपांडे यांचा विषय मला माहिती नाही. मी त्यावर बोलणार नाही. कोणी कोणावर हल्ला करत गृहमंत्र्यांनी त्यात लक्ष घालायला पाहिजे. कोणत्याही नागरिकावर असा हल्ला झाला नाही पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.