मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sandeep Deshpande Attack Case : मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरण; घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर, Live Video

Sandeep Deshpande Attack Case : मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरण; घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर, Live Video

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर भ्याड हल्ला झाला होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तातडीने विविध पथके तयार करत तपासणी सुरू केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर भ्याड हल्ला झाला होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तातडीने विविध पथके तयार करत तपासणी सुरू केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर भ्याड हल्ला झाला होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तातडीने विविध पथके तयार करत तपासणी सुरू केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 मार्च : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर भ्याड हल्ला झाला होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तातडीने विविध पथके तयार करत तपासणी सुरू केली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. हल्ला करून आरोप पळून जात असल्याचे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. दरम्यान यावरून आरोपीचा शोध सुरू आहे. अद्यापही कोणाला ताब्यात घेण्यात आले नाही.

सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसून येते की हल्ल्यानंतर, एक माणूस हातात स्टंप घेऊन जोरात धावत होता. यानंतर तो त्याच्या वाहनाजवळ गेल्यावर स्टंप फेकून पळून गेला.

या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पोलिसांनी दोन आरोपींची ओळख पटवली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 8 तुकड्या तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत.

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची चौकशी करा, मनसे नेत्याची खळबजनक मागणी

काय आहे नेमंक प्रकरण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शिवाजी पार्कमध्ये मॅार्निंग वॅाकला आले असता त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. अज्ञात लोकांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली. तर हा हल्ला परतवून लावण्याच्या प्रयत्नात संदीप देशपांडे यांच्या हाताला जबर मार लागल्याची माहिती आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संदीप देशपांडे यांच्यावर पाच अज्ञातांनी हल्ला केला. हल्लेखोर तोंडावर मास्क आणि रुमाल बांधून आले होते. तसेच त्यांच्याकडे हल्ला करण्यासाठी क्रिकेटचे स्टम्प होते. पाळत ठेवून हा हल्ला करण्यात आल्याचे दिसून येते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी युवासेना पदाधिकारी वैभव थोरात यांचा महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढला होता. या प्रकरणात त्यांच्यावर प्रकरण दाबण्यासाठी वारंवार फोन केले जात होते, अशी माहिती मिळाली आहे.

संदीप देशपांडेंना अखेर डिस्चार्ज, राज ठाकरे स्वत: गेले शिलेदाराला घ्यायला!

संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले.

First published:
top videos

    Tags: Cctv footage, MNS, Mumbai, Mumbai police, Raj Thackray, Sandeep deshpande, Shivaji park