मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण पुण्यात; कडक निर्बंधांनंतर समोर आली धक्कादायक आकडेवारी

देशातील सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण पुण्यात; कडक निर्बंधांनंतर समोर आली धक्कादायक आकडेवारी

सतत केलेल्या उपाय योजनांमुळेच कोरोनाला रोखता आलं असं BMCने म्हटलं आहे.

सतत केलेल्या उपाय योजनांमुळेच कोरोनाला रोखता आलं असं BMCने म्हटलं आहे.

देशातील सर्वात जास्त कोरोना ॲक्टिव्ह केसेस असलेले सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्रातच आहेत. त्यात पुणे पहिल्या (Coronavirus in pune) क्रमांकावर आहे.

  • Published by:  Priya Lad

पुणे, 12 मार्च :  पुण्याभोवती कोरोनाचा (coronavirus in pune) विळखा पुन्हा आणखी घट्ट होऊ लागला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला आवरण्यासाठी आता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध आजपासूनच लागू होत आहेत आणि त्यातच आता धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात (active corona cases in pune) आहेत. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार तब्बल 21,788 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

देशात सर्वात जास्त ॲक्टिव्ह केसेस सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्रातच आहेत. त्यात पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यातील अॅक्टिव्ह आणि नव्या रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहेत. पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 3 हजार नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरातही नव्या रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला आहे. तब्बल 1805  रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे शहरातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 9740 वर पोहोचली आहे.

पुण्यामध्ये कोरोनाची आकडेवारी काहीशी चिंताजनक आहे. अशावेळी पुण्यामध्ये काही कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. पुण्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला नसून कडक निर्बंध आणले जाणार आहेत, अशी माहिती पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी दिली.

हे वाचा - पुण्यात लॉकडाऊनची गरज आहे का? टाटा आणि प्रयास यांनी अहवालातून मांडली स्थिती

पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहेत. शुक्रवारी 12 मार्च 2021 म्हणजेच आ रात्रीपासून हे कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत.

1) 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यातून सवलत देण्यात आली आहे.

2) हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजता बंद करण्यात येतील. शिवाय एकूण क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच त्यांची सेवा देऊ शकतात.

3) याठिकाणाहून पार्सल सेवा 11 पर्यंत सुरू राहणार आहे.

4) विविध ठिकाणच्या बागा संध्याकाळी बंद राहणार आहेत.

5) कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त जण सहभागी होऊ शकत नाही.

6) मॉल्स आणि सिनेमागृह रात्री दहा वाजताच बंद होणार आहेत.

7) शिवाय टपरी किंवा सार्वजनिक रस्त्यावर पाचपेक्षा अधिक लोकांना उभं राहता येणार नाही.

8) सोसायटीतील क्लब हाउस देखील बंद करण्यात आले आहेत.

9) लायब्ररीमध्ये देखील 50 टक्के क्षमतेने लोकांना जाता येणार आहे.

10) ऑफिसेमधील कामकाज त्यांच्या वेळेनुसार सुरू राहणार आहे.

हे वाचा - COVID-19: पुण्यात 31 मार्चपर्यंत शाळा राहणार बंद, आज रात्रीपासून कडक निर्बंध

नागरिकांनी कोविडच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं आहे. शिवाय प्रशासनाचं कडक लक्ष देखील असल्याचं ते म्हणाले.

First published:

Tags: Corona hotspot, Corona virus in india, Coronavirus, Covid19, Maharashtra, Mumbai, Pune, World After Corona