Home /News /maharashtra /

हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश! अश्लिल व्हिडिओ शूट करून खंडणीसाठी व्यापारीला ठेवलं होतं डांबून

हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश! अश्लिल व्हिडिओ शूट करून खंडणीसाठी व्यापारीला ठेवलं होतं डांबून

घरी नेताच तिनं जबरदस्ती करत साथीदाराकडून अश्लिल व्हिडिओ चित्रीकरण करून मोठी खंडणीची मागणी केली.

बीड, 26 जुलै: वीटभट्टी मालकास फोन करून तुमच्याकडून विटा खरेदी करायच्या आहेत, असं म्हणत एका महिलेनं व्यवहार करण्यासाठी भेटायला बोलवलं. आग्रह करून महिलेनं व्यापाऱ्याला चहासाठी घरी नेलं. घरी नेताच तिनं जबरदस्ती करत साथीदाराकडून अश्लिल व्हिडिओ चित्रीकरण करून मोठी खंडणीची मागणी केली. एवढं नाही तर व्यापाऱ्याला आपल्या घरी डांबून ठेवलं, हे एखाद्या सिनेमाचं कथानक नसून बीड जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. हेही वाचा..बीड हादरलं! पत्नीच्या हत्येची भोगत होता शिक्षा, पॅरोलवर सुटून आल्यानंतर केलं असं पोलिसांनी सापळा रचून हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. सात आरोपी फरार आहेत. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. आरोपीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? आष्टी येथील एका महिलेने भ्रमणध्वनीवरून नितीन रघुनाथ बारगजे (रा. टाकळी ता. केज) या तरुणास फोन केला. तुमच्याकडून विटा खरेदी करायच्या आहेत, असे म्हणत सदरील तरुणास मांजरसुंबा येथे बोलावून घेतले. या ठिकाणीत त्यांच्यामध्ये विट खरेदी संदर्भात बोलणी झाली. माझ्या सोबत कोणी नाही, मला पाटोद्यापर्यंत सोडा, अशी विनवणी महिलेने नितीन बारगजे यांच्याकडे केली. त्यानुसार बारगजे पाटोद्यापर्यंत सोडण्यास गेले. या ठिकाणाहून पुन्हा महिलेने विनवणी केली, मला आता माझ्या आष्टी गावी सोडा, असे म्हटले, त्यानुसार बारगजे यांनी महिलेस घरी सोडले. घरी गेल्यानंतर महिलेने चहापाण्याचा आग्रह केल्यानंतर नितीन बारगजे याने चहा घेतला. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने बारगजे यास एका रुममध्ये कोंडले आणि महिलेने जबरदस्तीने लगट केली. त्याचा व्हिडिओ महिलेच्या साथीदारांनी काढला. हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू, असा दम देत त्यास मारहाण करत 15 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यानुसार 10 लाख रुपये देतो, त्यासाठी माझी शेती विकतो, अशी विनवणी बारगजे यांनी केल्यानंतर त्या महिलेने पैशासाठी बारगजे यांच्यासोबत एकास मोटारसायकलवर केज येथे पाठविले. केज येथे आल्यानंतर बारगजे यांनी आपल्या मित्र परिवाराकडे दहा लाख रुपये हात उसणे मागितले. अचानक दहा लाख रुपये कशाला हवेत? असा प्रश्‍न काही मित्रांना पडल्यानंतर यात काही तरी काळंबेरं आहे असा संशय त्यांना आला. बारगजे आणि त्याच्या मित्रांनी प्लॅनिंग केली. आपल्यासोबत आलेल्या व्यक्तीस विश्वासात घेत 'तुमचे अन्य लोक पैशासाठी बोलवा, व्हिडिओ क्लिप डिलिट करून प्रश्‍न कायमचा मिटवा, तुमचे पैसे देऊन टाकू', असे म्हटल्यानंतर संबंधिताने आपले साथीदार केजमध्ये बोलवून घेतले. तिघे जण स्कॉर्पिओमध्ये आले. या घटनेची माहिती केज पोलिसांना तत्पूर्वीच देण्यात आली होती. त्यानुसार नितीन बारगजे याच्याकडून खंडणी वसूल करणार्‍या शेखर पाठक यास पोलिसांनी अटक केली. हेही वाचा...VIDEO :भरधाव कंटेनरचा सिनेस्टाईल थरार, मद्यधुंद चालकानं उडवली अनेक वाहनं इतर आरोपी मात्र फरार झाले. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात नितीन बारगजे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा शिंदे, सविता वैद्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या