कोरोनाचा धोका कायम, पुण्यात गणेश विसर्जनाला परवानगी नाही - अजित पवार

कोरोनाचा धोका कायम, पुण्यात गणेश विसर्जनाला परवानगी नाही - अजित पवार

'गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास पुण्यात तब्बल 55 लाख लोक बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी परवानगी दिली जाऊ शकत नाही.'

  • Share this:

पुणे 14 ऑगस्ट: गणेशोत्सवाला सुरुवात होण्यास आता फक्त काही दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि परिसरात कोरोनाचा धोका कायम असल्याने सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी दिली जाऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं. अशी परवानगी दिल्यास पुण्यात तब्बल 55 लाख लोक बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी परवानगी दिली जाऊ शकत नसल्याचं त्यांनी आज आढावा बैठकीत बोलतांना सांगितलं.

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना' बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त करतानाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे महत्त्वाचे आहे.

तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचनाही त्यांनी आज प्रशासनाला दिल्या. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा (रक्तद्रव) थेरपी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गृहमंत्री अमित शहा झाले कोरोनामुक्त, आता होणार होम क्वारंटाइन

विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना'बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते होते.

आता मध्यमवर्ग देखील घेऊ शकेल Ayushman Bharatचा फायदा, 5 लाखांचा विमा कव्हर मोफत

अजित पवार पुढे म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 'कोरोना' रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच्या उपाययोजनाबरोबरच कोरोनाबाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच कोरोना विषाणूची भिती घालविण्यासाठी तसेच याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी छोट्या-छोट्या व्हीडिओच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 14, 2020, 5:56 PM IST
Tags: ajit pawar

ताज्या बातम्या