आता मध्यमवर्ग देखील घेऊ शकेल Ayushman Bharatचा फायदा, 5 लाखांचा विमा कव्हर मोफत

आता मध्यमवर्ग देखील घेऊ शकेल Ayushman Bharatचा फायदा, 5 लाखांचा विमा कव्हर मोफत

केंद्र सरकारने सामान्यांना आरोग्यासंदर्भात मोठा दिलासा दिला आहे. सरकारने आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana) योजनेची सीमा वाढवून यामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबाना देखील सामील करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : केंद्र सरकारने सामान्यांना आरोग्यासंदर्भात मोठा दिलासा दिला आहे. सरकारने आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana) योजनेची सीमा वाढवून यामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबाना देखील सामील करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील मध्यम वर्गीय कुटुंबाना देखील उपचारांसाठी वार्षिक 5 लाख रुपयांचा हेल्थ कव्हर (Yearly 5 Lac Rupee Health Cover) मिळेल. याआधी या योजनेचा लाभ केवळ आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गातील लोकच घेऊ शकत होते. मात्र आता मध्यम वर्गासाठी देखील या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचे हेल्थ इन्शुरन्स कव्हर असणार आहे.

सरकारने आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत (AB PM-JAY)सर्व आरोग्य वीमा योजनांना एकीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना देशभरात लागू करणारी संस्था नॅशनल हेल्थ अथॉरिटी (NHA)च्या गव्हर्निंग काऊंसिलने देशभरामध्ये यासाठी परवानगी दिली आहे, जेणेकरून मध्यम वर्गाला देखील या योजनेचा लाभ घेता येईल.

(हे वाचा-कोरोना काळात मोठ्या प्रमाणात झाला या पदार्थाचा खप, तुम्ही देखील करू शकता व्यवसाय)

5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत

आता या योजनेचा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला आहे, जेणेकरून हे समजता येईल की ही योजना पूर्ण प्रभावीपणे लागू करण्यासाठी कोणती  पावले उचलणे गरजेचे आहे. ही योजना लागू करण्यासाठीची बैठक केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सध्या आयुष्मान भारत योजनेचा लाभ देशातील 10.74 कोटी कुटुंबातील 53 कोटी नागरिक घेत आहेत. या योजनेअंतर्गत रुग्णालयातील 5 लाखांपर्यंतचे त्यांचे उपचार मोफत होत आहेत.

या लोकांना मिळेल फायदा

नॅशनल हेल्थ अथॉरिटी (NHA)ने अशी माहिती दिली की, या योजनेच्या सीमा वाढवल्याने सर्वाधिक फायदा इनफॉर्मल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना होईल, जे आतापर्यंत कोणत्याही इन्शूरन्स योजनेपासून दूर आहेत. त्याचप्रमाणे स्वयंरोजगार (self-employed) करणारे, MSME क्षेत्रात काम करणारे आणि मध्यम वर्गीय शेतकऱ्यांना देखील या योजनेचा फायदा होईल.

(हे वाचा-आणखी कमी होणार सोन्याचे भाव! शुक्रवारपासून 3395 रुपयांनी उतरले सोने)

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी असे सांगितले की, नॅशनल हेल्थ अथॉरिटी (NHA)च्या गव्हर्निंग काऊंसिलने भारत सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयांद्वारे सुरू असणाऱ्या आरोग्य योजनांना आयुष्मान भारत योजनेमध्ये एकीकृत (Integrate) करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना, बांधकाम व्यवसायातील लोकांना, सेंट्रल आर्म्ड फोर्सच्या जवानांना आणि अपघातग्रस्त लोकांना याचा फायदा होईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 14, 2020, 5:54 PM IST

ताज्या बातम्या