जाहिरात
मराठी बातम्या / देश /  गृहमंत्री अमित शहा झाले कोरोनामुक्त, आता होणार होम क्वारंटाइन

 गृहमंत्री अमित शहा झाले कोरोनामुक्त, आता होणार होम क्वारंटाइन

 गृहमंत्री अमित शहा झाले कोरोनामुक्त, आता होणार होम क्वारंटाइन

Home minister Amit Shah: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता होम क्वारंटाइनमध्ये काही दिवस राहणार असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 ऑगस्ट: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Home Minister Amit Shah) यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. शहा यांनीच ट्विटरवर ही माहिती देत डॉक्टरांचे आभार मानले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्याला योग्य प्रतिसादही मिळत असल्याने ते कोरोना मुक्त झाले आहेत. डॉक्टर्स, कुटुंबीय आणि चाहत्यांच्या सदिच्छेमुळेच आपण लवकर बरे झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता होम क्वारंटाइनमध्ये काही दिवस राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जाहिरात

केंद्रातल्या काही मंत्र्यांना गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असून सगळ्यांची प्रकृती चांगली असल्याची माहितीही देण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह काही केंद्रीय मंत्र्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असतांनाही शहा हे ट्विटरवर सक्रिय होते. अनेक विषयांवर ते आपली मतंही व्यक्त करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याची म्हटलं जात होतं. मात्र नंतर गृहमंत्रालयाने ते वृत्त फेटाळलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah
  • First Published :
जाहिरात
जाहिरात