• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • 'पुन्हा निवडणुका झाल्या तर 105 वरून 40 वर येतील', जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला

'पुन्हा निवडणुका झाल्या तर 105 वरून 40 वर येतील', जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला'भाजप स्वतःच्या चुका लपवण्यासाठी हे करत आहे. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी हे इव्हेंट केले जात आहेत.

'भाजप स्वतःच्या चुका लपवण्यासाठी हे करत आहे. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी हे इव्हेंट केले जात आहेत.

'भाजप स्वतःच्या चुका लपवण्यासाठी हे करत आहे. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी हे इव्हेंट केले जात आहेत.

  • Share this:
  पुणे, 02 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या संपत्तीवर आयकर विभागाने कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे. 'अजित पवारांच्या प्रापर्टी असल्याचं सांगितलं जातं आहे, पण त्या त्यांच्या आहेत की नाही हे माहिती नाही. विनाकारण काही सिद्ध होत नसताना केवळ बदनामीसाठी भाजप हे करत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी भाजपवर टीका केली आहे. तसंच, आम्ही निवडणुकांना घाबरत नाही पुन्हा जर निवडणुका झाल्या तर त्यांचे 105 वरून 40 वर येतील, असा टोलाही पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना (chandrakant patil) लगावला. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना जयंत पाटील यांनी राज्यात घडत असलेल्या घडामोडी आणि अनिल देशमुख, अजित पवार यांच्यावरील कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला आहे. 'भाजप स्वतःच्या चुका लपवण्यासाठी हे करत आहे. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी हे इव्हेंट केले जात आहेत.केंद्र सरकारच्या एजन्सी ह्या भाजपच्या हस्तक झाल्यात राष्ट्रवादी या सगळ्याचा सामर्थ्याने मुकाबला करेल, अशी टीका पाटील यांनी केली आहे. काटा किर्र्रर्रर्र! रायाचा नवा LOOK होतोय VIRAL; 'मन झालं बाजिंद'मध्ये..... 'अजित पवारांच्या प्रापर्टी असल्याचं सांगितलं जातं आहे, पण त्या त्यांच्या आहेत की नाही हे माहिती नाही. विनाकारण काही सिद्ध होत नसताना केवळ बदनामीसाठी भाजप हे करत आहे, असंही पाटील म्हणाले. 'मुळात भाजपला टोकाचा विरोध करुन राष्ट्रीवादी सत्तेत आहे. हेच भाजपला रुचत नाही, सर्व मार्गाने त्रास देणं, हे भाजपने पूर्णपणे ठरवलं आहे. अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री आहेत, त्यांच्यावर ज्यांनी आरोप केला, तो देश सोडून पळून गेला आहे. ज्या ठिकाणी पैशाची देवाण घेवाण कुठं झाली नाही, तिथं अटक करणे म्हणजे बदला घेणं आहे, वचपा काढणं आहे, एखाद्याला राजकीय दृष्ट्या संपवण्याच काम आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली. T20 World Cup : IPL न खेळलेले खेळाडूच वर्ल्ड कपमध्ये फोडतायत 'फटाके', दिग्गज फेल आजच देगलूर पोटनिवडणुकीचा निकाल लागतोय, त्यात भाजपची कशी धूळधाण झाली हे सगळे पाहतोय. त्यामुळे निवडणुकांना आम्ही घाबरत नाही पुन्हा निवडणूक घेतली तर चंद्रकांत पाटलांचे 105 होते ते 40 वर येतील, असा टोलाही पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. हे सगळं जे सुरू आहे ते सत्ता मिळवण्यासाठी सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांचं जे स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ आम्हाला लवकर सत्ता पाहिजे. कुठल्याही मार्गाने सत्ता मिळवण्यासाठी ही धडपड आहे. भाजपने समर्थ, स्वच्छ विरोध पक्षाचं काम करावं. अशा धाडी, असं अटक सत्र काही नवीन राहिलेलं नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
Published by:sachin Salve
First published: