• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • काटा किर्र्रर्रर्र! रायाचा नवा LOOK होतोय VIRAL; 'मन झालं बाजिंद'मध्ये येणार बिग ट्विस्ट

काटा किर्र्रर्रर्र! रायाचा नवा LOOK होतोय VIRAL; 'मन झालं बाजिंद'मध्ये येणार बिग ट्विस्ट

झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका 'मन झालं बाजिंद' (Man Zal Bajind) प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा (Krishna) आणि राया (Raya) हि जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे.

 • Share this:
  मुंबई,2 नोव्हेंबर- झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका 'मन झालं बाजिंद'  (Man Zal Bajind)  प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा  (Krishna) आणि राया  (Raya)  हि जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे.
  सालस कृष्णा आणि रांगडा राया प्रेक्षकांना भावले आहेत. रायाचा रांगडा लुक सगळ्यांच्या पसंतीस पडला असून त्याच्यासारखी स्टाईल त्याचे चाहते फॉलो करत आहेत. पण आता मालिकेत रायाचा वेगळा लुक लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राया आता शॉर्ट हेअर लुक मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या लुक मधील त्याचा हा खास फोटो समोर आला आहे. मालिकेत नुकतंच राया आणि कृष्णाच लग्न झालेलं प्रेक्षकांनी पाहिलं आहे. आता लवकरच राया या नवीन अवतारात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या नवीन लुकबद्दल राया म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण म्हणाला, "मी या नवीन लुकसाठी खूपच जास्त एक्सायटेड आहे. मालिकेत खूप घडामोडी घडत आहेत. कृष्णा आणि रायाच लग्न झालं आहे आणि आता पुढे मालिकेत अजून काही ट्विस्ट्स अँड टर्न्स येणार आहेत. मालिकेत येणाऱ्या नव्या ट्विस्टसाठी रायाचा हा लुक बदलण्यात आला आहे का? हे प्रेक्षकांना लवकरच कळेल आणि रायाच्या या नवीन लूकवर देखील प्रेक्षक तेवढंच प्रेम करतील का? पाहणं महत्वाचं "रायाचा हा नवीन लुक मधील फोटो पाहून प्रेक्षक देखील त्याच्या लुक चेंजबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. अभिनेत्री श्वेता खरात (Shweta Kharat) आणि अभिनेता वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. (हे वाचा:चला हवा येऊ द्या'मध्ये तानाजी आणि श्रेया झाले सैराट! हा VIDEO ... ) श्वेता याआधी ‘राजा राणी ची ग जोडी’ या कलर्स मराठी वाहिनी वरील मालिकेत सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. तर आधीही तिने अनेक मालिकांमध्ये लहान भूमिका साकारल्या होत्या. तर मन झालं बाजिंद या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनयासोबतच ती उत्तम डान्सरही आहे. सोशल मीडिया वर तिचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात.अभिनेता नितीश चव्हाण सोबत (Nitish Chavan) तिची डान्स केमिस्ट्री मागील काही दिवसांपासून चांगलीच हीट ठरलीहोती . ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचंही म्हटलं जातं.
  Published by:Aiman Desai
  First published: