यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम इंग्लंडच्या जॉस बटलरच्या (Jos Buttler) नावावर आहे. बटलरने 4 इनिंगमध्ये सर्वाधिक 214 रन केले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा निसांका आहे, त्याने आतापर्यंत 170 रन बनवले आहेत. बटलर आणि निसांका हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये नव्हते. जॉस बटलरने आयपीएलच्या (IPL 2021) दुसऱ्या राऊंडमधून माघार घेतली होती.
या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगाने (Wanindu Hasaranga) घेतल्या आहेत. हसरंगाच्या नावावर या स्पर्धेत 14 विकेट आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचा शाकिब अल हसन आहे. शाकिबने स्पर्धेत 11 विकेट घेतल्या. वानिंदु हसरंगा आयपीएलमध्ये आरसीबीच्या टीममध्ये होता, पण त्याला विराटने फक्त दोनच मॅच खेळण्याची संधी दिली.