पुण्यात धोका वाढला! खासगी हॉस्पिटल्स, कॉलेजेस आणि हॉटेल्स सरकार ताब्यात घेणार

पुण्यात धोका वाढला! खासगी हॉस्पिटल्स, कॉलेजेस आणि हॉटेल्स सरकार ताब्यात घेणार

'परिस्थिती अशीच राहिली तर खबरदारी म्हणून गरज पडली तर प्रशासनाने तयार राहावं. गाफील राहू नये.'

  • Share this:

पुणे 25 एप्रिल: राज्यात मुंबई नंतर पुण्यात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर खबरदारी म्हणून गरज पडली तर शहरातली खासगी हॉटेल्स आणि हॉस्पिटल्स अधिग्रहित करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाने गाफील न राहता पूर्वतयारी म्हणून शहरातील खाजगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरु करावी असे निर्देश आजच्या बैठकीत अजित पवारांनी दिली आहेत.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल त्यांनी मागील आढावा बैठकीत चिंता व्यक्त करून आठ दिवस लॉकडाऊन कडक करण्याचे आदेश दिले होते. आज पुन्हा त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक  घेतली. आणि पुणे व पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचा आढावा घेतला. या बैठकीत कोविड-19 बद्दल  जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच दोन्ही महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली.

या बैठकीत केंद्रशासनाने मॉल्स व्यतिरिक्त इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत जो निर्णय घेतला आहे,  त्याअनुषंगाने राज्य शासनस्तरावर जे धोरण निश्चित करण्यात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले.

महाराष्ट्राने गाठला मोठा टप्पा, COVIDE 19च्या झाल्या तब्बल 1 लाख टेस्ट

क्वारंटाइन सेंटर्स किंवा विलगीकरण सुविधा नव्याने तयार करण्यासाठी खाजगी हॉस्पिटल किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांची अथवा खाजगी हॉटेलची गरज भासल्यास एपिडिमिक ॲक्ट खाली जिल्हाधिकारी यांना अधिग्रहित करण्याबाबतचे अधिकार आहेत, त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी असं त्यांनी सांगितलं

ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाबद्दल अतीरिक्त 55 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ती  कामे लवकरात लवकर पूर्ण करुन येत्या दोन महिन्यात 8 वा, 9 वा आणि 10 वा मजला कार्यरत होण्याच्या दृष्टीने काम करावे, असे आदेश त्यांनी  दिले.

‘तशी वेळ आलीच तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील’

पुणे महानगरपालिकेमार्फत प्रामुख्याने झोपडपट्टी किंवा ज्या ठिकाणी नागरिकांना राहण्यासाठी  छोटी घरे आहेत, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित राहत आहेत. त्यांच्याकरिता वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी या भागातील नागरिक जाऊन थांबू शकतील. परिणामी  सामाजिक अंतराचे पालन होऊन, कोरोना विषाणूपासून बचाव होण्यास मदत होईल याची काळजी घ्या असंही त्यांनी सांगितलं.

ज्या नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, किडनीविकार किंवा अस्थमाचा आजार असेल, अशा नागरिकांनी स्वतःच्या तब्येतीची अधिक काळजी घ्यावी.  त्यांनी कोणत्याही कारणांसाठी  घराबाहेर पडू नये. अशावेळी कोणताही कोरोनाबाधित रुग्ण आपल्या संपर्कात आल्यास आपणास कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तो टाळावा, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

 

 

First published: April 25, 2020, 7:58 PM IST
Tags: pune

ताज्या बातम्या