मुंबई 25 एप्रिल: कोरोना व्हायरसच्या लढाईत राज्याने आता मोठा टप्पा गाठला आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी ट्रेसिंग, टेटिस्टिंग आणि ट्रिटमेंट या तीन ‘टी’ चा फॉर्म्युला सांगितला जातो. कोरोना पेशंट्स जास्त असल्याने राज्याने टेटिस्टिंगच्या संख्येतही वाढ केला आहे. राज्यात गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. 40 प्रयोगशाळांच्या माध्यमातून राज्याने चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा गाठला आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या असून त्यामुळे रुग्णांच्या निदानात मोठी मदत होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत राज्यात 1 लाख 8 हजार 972 नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी 94 हजार 485जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 6817 जण पॉझिटिव्ह आले. राज्यात आज शासकीय आणि खासगी प्रत्येकी 20 अशा एकूण 40 प्रयोगशाळा आहेत. तिथे दररोज पाच ते सात हजार चाचण्यांची क्षमता असून जास्त चाचण्या होत असल्याने कोरोनाच्या रुग्णांचे तातडीने निदान होणे शक्य होत आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्यात सुरूवातीला फक्त पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (NIV) तपासणीची सुविधा होती. राज्यात साधारणत: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाच जणांचे नमुने पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत साधारणपणे तीन महिन्यात राज्यातील चाचण्यांचा आकडा लाखावर गेला आहे. ‘तशी वेळ आलीच तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील’ सुरूवातीला फक्त पुणे येथे असलेली ही सुविधा नंतर मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालय, नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आली. संशयीत रुग्ण संख्या वाढल्याने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे राज्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली. Good News - भारताची स्थिती सुधारली; कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर झाला कमी केईएम येथेही सुविधा सुरू झाली. टप्प्याटप्प्याने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात असंही ते म्हणाले. आयसीएमआरने खासगी प्रयोगशाळांनाही चाचण्यांना मान्यता दिल्याने राज्यात झपाट्याने प्रयोगशाळांची संख्या वाढत गेली. त्यामुळे ठिकठिकाणी चाचण्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याचा फायदा रुग्णांच्या निदानात मोठा फायदा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.