पुणे, 02 जुलै: गेल्या महिन्यात पुण्यातील (Pune) आंबिलओढा (Ambil Odha Slum) परिसरातील अतिक्रमण असणाऱ्या घरांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपात (BJP) जोरदार आरोप प्रत्यारोप झालेत. या कारवाईमध्ये गाजावाजा झाला. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. आंबिल ओढ्याची खूप चर्चा झाली. माझा काही दुरान्वये संबंध नाही. तो प्रशासनाचा निर्णय होता, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. मी माझ्यावरची जबाबदारी कधीच झटकत नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. माझी बहिण तिथे गेली तर पालकमंत्री मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. उगाच काय राजकारण करता?, अशी संप्तत प्रतिक्रिया अजित पवारांनी आज दिली आहे. परवा पुणे महापालिका संदर्भात बैठक घेतली. महापौरांना बोलावलं होतं.पण बातमी उलट्या आल्या. मात्र त्यांच्याशी बोललो तर घरी एक दुर्घटना घडली होती म्हणून त्यांनी सांगितलं. मी कधी ही असं वागत नाही. मी पण पुणेकर आहे. पुणेकरांचा अपमान मी होऊ देणार नाही, असं अजित पवार म्हणालेत. हेही वाचा- ईडीच्या कारवाईवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सविस्तर प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी घेतली होती भेट पुणे महापालिकेच्या गेटवर आंदोलन करत असलेल्या आंबील ओढ्याच्या कारवाईत बाधित झालेल्या कुटुंबीयांची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. सुमारे तासभर सुप्रिया सुळे या रस्त्यावर या बाधित कुटुंबीयांच्या सोबत जमिनीवर खाली बसल्या होत्या. ‘तुमच्यावर झालेल्या कारवाईबद्दल ज्यांना कुणाला जाब विचारायचा असेल त्यांच्याकडे आपण तुमच्या सोबत येऊ’ असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले. मात्र, कुटुंबीयांनी आक्रमक होत सुप्रिया सुळे यांच्यासमोर थेट अजित पवार यांचं नाव घेऊन आरोप केला. त्यानंतर अजित पवार यांच्या आदेशाने ही कारवाई झाली असेल तर पुरावे द्या, मी तुमच्या वतीने त्यांची तक्रार करेन, अशी रोखठोक भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली. हेही वाचा- मोठी बातमी: पुणेकरांची Lockdown मधून सुटका नाहीच, जाणून घ्या नवे निर्बंध आंबिल ओढा प्रकरण गेल्या महिन्यात पुण्यातील (Pune) आंबिलओढा (Ambil Odha Slum) परिसरातील अतिक्रमण असणाऱ्या घरांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान पुणे पालिकेच्या तोडकामाला न्यायालयाने स्थगिती दिली गेली. अतिक्रमण कारवाईमध्ये 130 कुटुंबांना हटवण्यात आले. कारवाई करून बाहेर काढलेल्या 130 कुटुंबांपैकी 81 कुटुंबांच्या राहण्याची व्यवस्था राजेंद्रनगरच्या एसआरए कॉलनीमध्ये करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.