Home /News /pune /

पुण्यातील हॉटेलमधील हायप्रोफाइल राडा; UPSC ची तयारी करणाऱ्या नवऱ्याने पत्नीला रंगेहाथ पकडलं

पुण्यातील हॉटेलमधील हायप्रोफाइल राडा; UPSC ची तयारी करणाऱ्या नवऱ्याने पत्नीला रंगेहाथ पकडलं

पतीनं पत्नीला एका मित्राबरोबर आलिशान हॉटेलमध्ये पकडल्यानंतर बेदम मारहाण केली होती. नगर रसत्यावर असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये हा प्रकार घडला होता.

    पुणे, 18 एप्रिल : पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा पाठलाग करत तिला व तिच्या प्रियकराला मारहाण (Husband beat wife and her lover) करणाऱ्या पती आणि त्याच्या मित्रांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पतीनं पत्नीला एका मित्राबरोबर आलिशान हॉटेलमध्ये पकडल्यानंतर बेदम मारहाण केली होती. नगर रसत्यावर असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये हा प्रकार घडला होता.(Husband catches wife in hotel with lover) (वाचा - आधी तलवारीने वार केले नंतर तक्रार मागे घेण्यासाठी धमकी देऊन कारने उडवले, भिवंडीतील घटना) पुण्यातील उच्च वर्गातील हे दाम्पत्य असल्याचं समोर आलं आहे. आकाश मान हा इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अधिकारी होता. मात्र राजीनामा देऊन तो युपीएससीची तयारी करत आहे. तर त्याची पत्नी ही बँकर असल्याची माहिती मिळाली आहे. आकाश याला त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयावरून तो पत्नीवर पाळत ठेवून होता. त्यानुसार एक दिवस आकाशने पत्नीचा पाठलाग केला आणि एका आलिशान हॉटेलमध्ये त्यानं प्रियकरासह पकडले. यानंतर या हॉटेलमध्ये चांगलाच राडा झाला होता. त्यात पत्नीला बेदम मारहाण करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर तिच्या प्रियकरालाही बेदम मारहाण करण्यात आली होती. यावेळी आकाशबरोबर त्याचे मित्रही होते. (वाचा-VIDEO: आईला पाहा डॉक्टर साहेब; मुलाच्या आर्त हाकेनंतरही डॉक्टरनं नाही केला उपचार) महिलेने या प्रकरणी पतीच्या आणि त्याच्या मित्रांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार महिला तिचा मित्र असलेल्या जगप्रकाश पांडे यांच्याबरोबर या हॉटेलमध्ये उतरली होती. महिला मित्राच्या खोलीमध्ये सामान ठेवण्यासाठी गेली त्याचवेळी तिचा पती तिथं मित्रांबरोबर आला. त्यानंतर त्यानं महिलेला बेदम मारहाण केली. तिच्या मित्राने सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. पतीच्या मित्रांनीही मारहाण केल्याची तक्रार त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या राड्याबाबत माहिती आणि तक्रार मिळाल्यानंतर सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. पण हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर महिलेचा पती आणि त्याच्या मित्रांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Women extramarital affair

    पुढील बातम्या