मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'माझ्या आईला पाहा डॉक्टर साहेब'; मुलाच्या आर्त हाकेनंतरही झोपेसाठी डॉक्टरनं नाही केले उपचार, शिवीगाळ केल्याचा Video Viral

'माझ्या आईला पाहा डॉक्टर साहेब'; मुलाच्या आर्त हाकेनंतरही झोपेसाठी डॉक्टरनं नाही केले उपचार, शिवीगाळ केल्याचा Video Viral

नातेवाईक हात जोडून डॉक्टरला विनंती करत होते, की एकदा रुग्णाला तपासा, मात्र डॉक्टरला काहीही फरक पडला नाही. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे.

नातेवाईक हात जोडून डॉक्टरला विनंती करत होते, की एकदा रुग्णाला तपासा, मात्र डॉक्टरला काहीही फरक पडला नाही. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे.

नातेवाईक हात जोडून डॉक्टरला विनंती करत होते, की एकदा रुग्णाला तपासा, मात्र डॉक्टरला काहीही फरक पडला नाही. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे.

पाटणा 18 एप्रिल : कोरोना (Coronavirus) काळात असे अनेक डॉक्टर (Doctor) आहेत, जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करतात. या डॉक्टरांनी कित्येक रुग्णांना जीवदान दिलं आहे. मात्र, आता एक असा डॉक्टर समोर आला आहे, ज्यानं सर्व हद्दी पार करत रुग्णाला शिवीगाळ केली. रुग्णावर उपचार करणं तर दूरच या डॉक्टरनं नातेवाईकांना शिवीगाळ करत धमकीही दिली. कारण फक्त इतकंच होतं, की रात्री ड्यूटीवर असणाऱ्या या डॉक्टरची झोपमोड झाली. यामुळे डॉक्टरनं रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला आणि शिवीगाळही केली. नातेवाईक हात जोडून डॉक्टरला विनंती करत होते, की एकदा रुग्णाला तपासा, मात्र डॉक्टरला काहीही फरक पडला नाही. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे.

हे प्रकरण आहे जबलपूर जिल्हा रुग्णालय विक्टोरिया येथील. इथे एक कुटुंब रात्री उशिरा रुग्णाला घेऊन रुग्णालयात पोहोचलं. सुरुवातील त्यांनी तिथे बराच वेळ डॉक्टरला शोधलं. नंतर त्यांना समजलं की ड्यूटीवर असणारा डॉक्टर भरत दुबे झोप घेत आहे आणि त्यांनी या डॉक्टरला उठवण्याची चूक केली. झोपमोड झाल्यानं डॉक्टरनं नातेवाईकांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला.

" isDesktop="true" id="541466" >

सर्वच कोरोना रुग्णांना Plasma therapy देणं गरजेचं आहे?

यादरम्यान रुग्ण असलेल्या महिलेचा मुलगा आणि मुलगी हात जोडून एकदा आमच्या आईला पाहा, अशी विनंती डॉक्टरांकडे करू लागले. मात्र, भरत दुबेनं एकदा रुग्णाकडे पाहिलंदेखील नाही आणि सलग धमकी आणि शिवीगाळ करत राहिला. शिवीगाळ करू नका, असं रुग्णाच्या नातेवाईकांनी म्हणताच, तू काय करशील, तुला मी दाखवतो, अशी धमकी डॉक्टर देऊ लागला. यादरम्यान कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

First published:
top videos

    Tags: Live video viral, Private hospitals, Social media viral