जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / फणसाची चवदार भाजी कशी करतात हे माहिती आहे? पाहा घरीच करण्याची सोपी पद्धत, Video

फणसाची चवदार भाजी कशी करतात हे माहिती आहे? पाहा घरीच करण्याची सोपी पद्धत, Video

फणसाची चवदार भाजी कशी करतात हे माहिती आहे? पाहा घरीच करण्याची सोपी पद्धत, Video

फणसाची भाजीही केली जाते हे अनेकांना माहिती नसतं. या भाजीची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 3 एप्रिल : प्रत्येक सिझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याकडं केल्या जातात. कोकणातील काही भागात उन्हाळ्यात कच्च्या फणसाची भाजी केली जाते. उन्हाळ्यात फणसाचा सिझन असतो. त्यामुळे ही भाजी केली जाते. राज्यातील अन्य भागातील नागरिकांना फणस हे फक्त फळ म्हणून माहिती आहे. पण, याच फणसाची भाजी देखील केली जाते, हे माहिती नसतं. पुण्यातील सोनाली नलावडे यांनी फणसाच्या भाजीची खास रेसिपी आपल्यासोबत शेअर केली आहे. फणसाच्या भाजीचं साहित्य आणि कृती कच्चे फणस, 5 आमसूल, 1 मोठा कांदा, 5 लसूण पाकळी, ओले काजू, ओले खोबरे, लाल तिखट, हळद आणि मीठ ही भाजी तयार करताना पहिल्यांदा फणस कापावे लागेल. त्यासाठी पहिल्यांदा हाताला आणि चाकूला तेल लावावे. तसं केल्यानं फणसाचा चीक हाताला चिकटत नाही. फणसाच्या बाहेरील काटेरी भाग कापून घ्यावा. फणसाच्या चिकाचा मुख्य घट असलेला कोपा देखील कापून टाकावा. त्यानंतर उरलेल्या फणसाची आपल्याला भाजी करायची आहे. व्यापाऱ्यांनी केली निर्मिती, संपूर्ण जगात फेमस झाली सोलापूरची बाजार आमटी! पाहा Recipe Video उर्वरित  फणसाचे मोठे  तुकडे करून घ्यावे. ते कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकावे शिजताना त्यामध्ये थोडेसे मीठ टाकावे कारण की उर्वरित जो फणसाचा चिक आहे तो देखील त्यामुळे निघून येतो. तुम्ही कुकर ऐवजी पातेल्यात देखील हे फणसाचे तुकडे शिजवू शकता. कुकरमधील तीन शिट्ट्यांमध्ये हा फणस शिजतो. चुलीवरची झणझणीत पुरीभाजी, पाहाताक्षणी सुटेल तोंडाला पाणी, पाहा Video फणस शिजल्यावर पाण्यातील फणसाचे तुकडे काढून घ्यावेत. ते तुकडे हाताने कुस्करावेत. तर, दुसरीकडे कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये ठेचलेला लसूण, कांदा परतून घ्यावा. कांदा चांगला लालसर परतल्यावरती त्याच्यावरती लाल तिखट, हळद आपल्याला हवे तसे चवीपुरते मीठ, आमसूल, काजू आणि कुस्करलेले फणस टाकून ही भाजी छान पैकी परतून घ्यावी. भाजीला तेल सुटल्यावर त्याच्यावरती ओल्या खोबऱ्याचा कीस घातला की अगदी चविष्ट भाजी तयार होते.  फणस उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही भाजी बेतानेच खावी.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात