मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /व्यापाऱ्यांनी केली निर्मिती, संपूर्ण जगात फेमस झाली सोलापूरची बाजार आमटी! पाहा Recipe Video

व्यापाऱ्यांनी केली निर्मिती, संपूर्ण जगात फेमस झाली सोलापूरची बाजार आमटी! पाहा Recipe Video

X
Recipe

Recipe Video : संपूर्ण जगात फेमस असलेली सोलापूरची बाजार आमटी कशी तयार करतात हे पाहूया

Recipe Video : संपूर्ण जगात फेमस असलेली सोलापूरची बाजार आमटी कशी तयार करतात हे पाहूया

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

अनुराग सुतकर, प्रतिनिधी

सोलापूर, 1 एप्रिल : कधी शहराचं तर कधी गाजलेल्या शेफचं नाव एखाद्या डिशला मिळतं. सोलापूर शहरातील तर अनेक डिश या फेमस आहेत. वेगवेगळ्या संस्कृती एकत्र नांदत असलेल्या या शहराची खाद्यसंस्कृतीही श्रीमंत आहे. सोलापूरची बाजार आमटी ही गेल्या कित्येक दशकांपासून फेमस आहे. काय आहे ही बाजार आमटी? हे नाव का पडलं? सोलापूरमध्ये ही फेमस डिश कुठं मिळते ते पाहूया

कसं मिळालं नाव?

'सोलापूर जिल्ह्यातील करकंब हे बाजार आमटीचं उगमस्थान आहे. सोलापूरमध्ये यापूर्वीपासूनच बाहेरच्या गावातील व्यापारी बाजारासाठी येतात. खाण्यासाठी काही तरी बनववावं, या उद्देशानं ते चार-ते पाच डाळी एकत्र करुन आमटी बनवत असतं. या आमटीची चव भन्नाट आहे. त्यामुळे ती अगदी कमी कालावधीमध्ये बाजारात फेमस झाली. याच कारणामुळे त्याचे नाव बाजार आमटी असं पडलं,' अशी माहिती सोलापूरमधील महावीर प्युअर व्हेज बाजार आमटीचे मालक  प्रद्युम्न पुरवत यांनी दिली.

अस्सल सोलापुरी नॉनव्हेजसाठी 'इथं' भेट द्या, एकदा खाल तर बोटं चाखाल! Video

कशी तयार करतात बाजार आमटी?

- चार ते पाच डाळी व्यवस्थित शिजवून त्या एकत्र कराव्या

- त्यानंतर एका पॅनमध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता. सर्व कच्चा मसाला टाकून फोडणी द्यावी

- त्यामध्येच काळे तिखट टाकून सर्व मिश्रण एकजीव करावे

- त्यानंतर त्यामध्ये डाळ आणि पाणी टाकून ते व्यवस्थित शिजवले की बाजार आमटी तयार होते.

राहुल पोपटलाल पूरवत यांनी या महावीर बाजार आमटी या रेस्टॉरंट ची सुरुवात केली होती. घरगुती कच्चे मसाले वापरून तसेच अस्सल सोलापुरी काळ तिखट वापरून ही बाजारामध्ये गेल्या दोन दशकांपासून सोलापूरच्या खवय्यांना तृप्त करत आहे विशेषत: कडक भाकरीसोबत ही आमटी आणखी भन्नाट लागते. प्रत्येक सोलापूरकरला आमच्या आमटीबाबत माहिती आहे, असा दावा प्रद्युम्न यांनी केला.

First published:
top videos

    Tags: Food18, Local18, Local18 Food, Solapur