Home /News /pune /

पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढताना दिसत आहे.

पुणे, 20 जून: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली. पुणे तसेच पिंपरी चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समितीची स्थापना केली जाणार असून समितीच्या अभ्यासानंतर पुणे आणि पिंपरी -चिंचवड क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम उभे करणार असल्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे सांगितले. हेही वाचा...दलीत वस्ती योजना घोटाळा! भाजप आमदार आक्रमक, अधिकारी महिलेवर गंभीर आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात पुणे तसेच पिंपरी- चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत आढावा घेतला. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुकत शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, रतन किराड, मनोज सारडा,जयंत शेटे,सतिश मगर आदी उपस्थित होते. गृहनिर्माणमंत्री आव्हाड म्हणाले, पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरात ज्या सनदी अधिका-यांनी यापूर्वी काम केले आहे, शहरांच्या विकासासाठी योगदान दिले आहे,अशा माजी सनदी अधिका-यांचा सहभाग घेत एक समिती स्थापन केली जाणार आहे, या समितीमध्ये शहराच्या विकासात योगदान देणारे इतर जाणकार प्रतिनिधीही असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून या समिती तसेच झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कार्याला अंतीम स्वरूप देण्यात येईल. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचे नवीन पथदर्शी मॉडेल तयार करून गती देणार असल्याचे सांगतानाच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या वतीने झोपडपट्टीवासियांना पुढील काही महिन्यात ओळखपत्र देण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी मांडलेल्या मागण्यासंदर्भात गृहनिर्माण विभागाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचेही गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी सांगितले. तसेच झोपडपट्टी विकासाच्या धोरणाची वाटचाल, योजना अंमलबजावणीची प्रक्रिया, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सद्य:स्थिती, तेथील अडचणी, शासनाचे अर्थसहाय्य, झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन, अंतर्भूत प्रकल्प, सध्याची स्थिती, अडकलेले प्रकल्प, प्रस्ताव आदी विषयांसह शहरातील मध्यवस्तीतील बाजारपेठेच्या अडचणी, त्या सोडवणुकीच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. हेही वाचा...काँग्रेसचे नेते लाचार तर सत्तेच्या वाटमारीत उद्धव ठाकरेंचीही फरपट- राधाकृष्ण विखे पाटील सरकारनंही उचलला फायदा.. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी पूर्नविकास खात्याने पुण्यातील आपल्या नवीन ऑफिसचं भाडं कमी करून घेतलं आहे. पुण्यातील काकडे मॉलमध्ये 'एसआरए'नं चं नवं वातानुकुलित कार्यालय भाड्याने घेतलं असून त्याचं मासिक भाडं हे तब्बल 12 लाख आहे. त्यावरून स्वत: पालकमंत्री अजित पवार यांनीही उद्घाटनावेळीच जाहीरपणे अधिकाऱ्यांना सुनावलं होतं. विभागाचे सीईओ राजेंद्र निंबाळकर काकडे मॉलमधील एसआरए ऑफिसचं भाडं कोरोना लॉकडाऊनच्या काळात 10 लाखांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. हाच प्रश्न गृहनिर्माण मंञी जितेंद्र आव्हाड यांना केला असता त्यांनी काहिसी नाराजी दाखवत उत्तर देणं टाळलं. पण नंतर निंबाळकरांनीच या भाडे कपातीची माहिती दिली. विरोधक विनाकारण राजकारण करतात.. राज्यात कोरोना सारखं महाभयंकर संकट असताना विरोधक विनाकरण राजकारण करत आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सटकून टीका केली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये किमान मला तरी कोणतीही कुरबूर अथवा गडबड दिसत नसल्याचा दावा यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
First published:

Tags: Corona, Coronavirus, Jitendra awhad, Pune news

पुढील बातम्या