• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • दलीत वस्ती योजना घोटाळा! भाजप आमदार आक्रमक, अधिकारी महिलेवर गंभीर आरोप

दलीत वस्ती योजना घोटाळा! भाजप आमदार आक्रमक, अधिकारी महिलेवर गंभीर आरोप

9 कोटी 35 लाख रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर हे आक्रमक झाले आहेत.

  • Share this:
उस्मानाबाद, 20 जून: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीत वस्ती योजनेतील 9 कोटी 35 लाख रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर हे आक्रमक झाले आहेत. या घोटळ्याला उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे याच जबाबदार असल्याचा धक्कादायक आरोप आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केला आहे. हेही वाचा...काँग्रेसचे नेते लाचार तर सत्तेच्या वाटमारीत उद्धव ठाकरेंचीही फरपट- राधाकृष्ण विखे पाटील आमदार ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. आमदार ठाकूर यांच्या आरोपाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दलित वस्ती घोटाळ्यात औरंगाबाद विभागीय चौकशी समितीने सर्व दोषी संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन महिना झाला आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी कारवाई न केल्याने आमदार ठाकूर यांनी या संपूर्ण प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. काय आहे प्रकरण? उस्मानाबाद जिल्ह्यातील दलित वस्ती घोटाळा गेली अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्तांच्या कडे पुरावे देत घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर आयुक्त कार्यालयाने चौकशी केली. 21 मे 2020 रोजी चौकशी अहवाल कारवाईसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे. घोटाळ्याचे हे प्रकरण फार गंभीर स्वरूपाचे असून कुठलेही नियम न पाळता खरेदी पद्धत अवलंबल्याचा ठपका ठेवण्यात आला असून ठेकेदारासह दोषी अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची शिफारस केली आहे. या घोटाळ्यात तत्कालीन तहसीलदार अभिजीत मस्के यांना बळीचा बकरा केले जात असून खरा सूत्रधार बाहेर येणे गरजेचे असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात एक टोळी सक्रिय असून त्यांनी शासनाच्या पैशावर डल्ला मारला जात आहे. त्यामुळे दलित वस्तीसह गेल्या 2 वर्षात मिळालेल्या संपूर्ण निधीच्या विशेष ऑडिट (लेखा परिक्षणाची) मागणी केली. जिल्हा नियोजन समितीच्या अनेक बैठकांचे इतिवृत्त सोयीनुसार बदलल्याचा आरोप केला. दलित वस्ती मधील नगरपालिका आध्या एंटरप्रायजेसला उमरगा, कळंब व लोहारा या नगर परिषद क्षेत्रातील दलित वस्तीत खुली व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी 22 मार्च 2019 रोजी 2 कोटी 48 लाख रुपये काम करण्यापूर्वी अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले होते कोणतेही साहित्य पुरवठा करण्यात आले नाही शिवाय करोडोंची रक्कम ठेकेदार यांच्याकडेच आहे, त्यामुळे ही रक्कम शासनाला परत करावी, असे औरंगाबाद विभागीय समिती व जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले आहे. ए वन एंटरप्रायजेसला 2019-20 मध्ये नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत उमरगा, परांडा, नळदुर्ग व लोहारा या पालिकेत कॉम्पॅक्टर बसवण्यासाठी 25 जुलै 2019 रोजी 1 कोटी 99 लाख दिले होते. मात्र, त्यांनी साहित्य पुरवठा केला नाही. स्मशानभूमीत 579 सोलर पथदिवे बसविण्यासाठी मुंबई येथील ए टू झेड एंटरप्रायजेस या संस्थेला 3 ऑगस्ट 2019 रोजी 4 कोटी रुपये इकवीटस बँकेतून देण्यात आले. मात्र त्यांनीही काम पूर्ण केले नाही या ठेकेदारांना पैसे परत करण्यास सांगितले असून त्यांनी पैसे परत न केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी मुधोळ यांनी अंतिम नोटीशीत दिला आहे. हेही वाचा.. नगरसेवकाच्या घणाघाती हल्ल्यानंतर सभा सुरू असतानाच तुकाराम मुंढेंनी सोडलं सभागृह उस्मानाबाद जिल्ह्याचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, घोटाळ्यातील निलंबित तहसीलदार अभय मस्के, आध्या एंटरप्रायजेसचे मालक प्रताप राजेंद्र गायकवाड ( रा समर्थ नगर, उस्मानाबाद) ई झोन एंटरप्रायजेसचे फईम जलील शेख( रा माळी गल्ली, उस्मानाबाद) , ए टू झेड एंटरप्रायजेस मुंबई, ए वन एंटरप्रायजेस या चार संस्थेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अवल कारकून आर पी कोलगणे, लिपिक बी एस मोरे व श्रीमती के बी कांदे, तत्कालीन लेखाधिकारी दिलीप वाळवेकर यांच्यासह इकवीटस बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक उस्मानाबाद या 11 जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. यापैकी बँक व्यवस्थापक, काही ठेकेदार व कमर्चाऱ्यांनी त्यांचे म्हणणे सादर केले असून पराग सोमण यांनी म्हणणे सादर करण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. एवढ्या दिवस कागदपत्रे घेऊन पाठपुरावा करणाऱ्या आमदार ठाकूर यांनी आता पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी यांच्या वर आरोप केल्याने आता जिल्हाधिकारी कोणते पाऊल उचलतात याकडे लक्ष लागले आहे.
First published: