• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • काँग्रेस नेते लाचार तर सत्तेच्या वाटमारीत उद्धव ठाकरेंचीही फरपट- राधाकृष्ण विखे पाटील

काँग्रेस नेते लाचार तर सत्तेच्या वाटमारीत उद्धव ठाकरेंचीही फरपट- राधाकृष्ण विखे पाटील

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

  • Share this:
शिर्डी, 20 जून: भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. घाटा नको वाटा पाहिजे, असं हे राज्य सरकार असल्याची टोला देखील विखे पाटील यांनी लगावला आहे. हेही वाचा...कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी पर्यटकांसाठी प्रशासनानं घेतला मोठा निर्णय स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार असून मातोश्रीचा रिमोट आता शिवसेनेच्या हातात राहिलेला नाही. सत्तेच्या वाटमारीत शिवसेनेचं मोठं नुकसान होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही मोठी फरपट होताना दिसत आहे. त्यामुळे आता सत्तेत राहयचं की नाही याचा विचार शिवसेनेने करण्याची वेळ आली आहे, असंही विखे पाटील यांनी 'न्यूज 18 लोकमत'शी बोलताना सांगितलं. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्ष पद मिळाले. थोरातांची स्वतःची कर्तबगारी काय? थोरात म्हणजे दिशा हरवलेला माणूस असल्याचं सांगत त्यांनी निशाणा साधला. गेल्या सहा महिन्यात त्यांनी अशी कोणती कर्तबगारी दाखवलीय, असा सवाल विखे पाटील यांनी केला आहे. राज्यात कोरोना सारखं मोठ संकट असताना राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. कोणताही निर्णय घेताना सरकारमधील तिन्ही पक्षात समन्वय नाही. राज्य सरकारच आज संभ्रमात आहे. हेही वाचा...गलवानमध्ये हिंसक संघर्ष! चीनच्या फसवणुकीनंतर भारतानं तयार केला 'प्लॅन बी' राज्यातील जनतेच्या प्रश्नासाठी बैठक होत नाही तर आपापसातील वाद मिटवण्यासाठी बैठका होत आहे. काँग्रेसला एव्हढी लाचारी का करावी लागत आहे? असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार असल्याची सणसणीत टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. काँग्रेसची राज्यात वाताहात झाली असल्याचंही विखे पाटील यावेळी म्हणाले.
First published: