मराठी बातम्या /बातम्या /पुणे /New Corona Rules: पुण्याच्या वैशाली, गुडलकसह 47 हॉटेलांवर कारवाई

New Corona Rules: पुण्याच्या वैशाली, गुडलकसह 47 हॉटेलांवर कारवाई

रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असूनही पुण्यासारख्या शहरात अजूनही लोक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. पुणे प्रशासनाने आक्रमक करवाईला सुरुवात केली आहे.

    पुणे, 22 फेब्रुवारी : पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यांत अनेक ठिकाणी कोरोनारुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्यात Covid-19 ची दुसरी लाट येते का अशी चिन्हं आहेत. प्रशासनाने पुन्हा एकदा निर्बंध कडक करत सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कसह इतर नियम लागू केले आहेत. पण पुण्यासारख्या शहरात अजूनही लोक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. पुणे प्रशासनाने आक्रमक करवाईला सुरुवात केली आहे.

    नियमापेक्षा अधिक माणसांना प्रवेश दिला म्हणून पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई करत काही हॉटेलांना दंड लावला आहे. फर्ग्युसन रस्त्यावरच्या प्रसिद्ध वैशाली रेस्टॉरंटचा यामध्ये समावेश आहे. तसंच जुन्या आणि प्रसिद्ध गुडलक हॉटेलवरही आरोग्य विभागाने कारवाई केली आहे.

    ठरलेल्या नियमानुसार क्षमतेपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. वैशाली, गुडलकसह पुण्यातल्या 47 हॉटेल्सवर प्रत्येकी 5000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

    वाचा - 'संयमानं सामना केला पण आता...', कोरोनाशी झुंजणाऱ्या आरोग्यमंत्र्यांचं पत्र

    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown, Pune