मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'संयमानं सामना केला पण आता...', कोरोनाशी झुंजणाऱ्या आरोग्यमंत्र्यांचं रुग्णालयातून पत्र

'संयमानं सामना केला पण आता...', कोरोनाशी झुंजणाऱ्या आरोग्यमंत्र्यांचं रुग्णालयातून पत्र

आरोग्यमंत्री (Health minister) राजेश टोपे (Rajesh tope) यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झालेली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोग्यमंत्री (Health minister) राजेश टोपे (Rajesh tope) यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झालेली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोग्यमंत्री (Health minister) राजेश टोपे (Rajesh tope) यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झालेली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई, 22 फेब्रुवारी : राज्यात कोरोनानं (coronavirus in maharashtra) पुन्हा डोकं वर काढलं आहे. व्हायरस झपाट्यानं हातपाय पसरू लागलं आहे. कित्येक मंत्र्यांनाही कोरोनानं विळखा घातला आहे. त्यापैकीच एक म्हणजे आरोग्यमंत्री (Health minister) राजेश टोपे (Rajesh tope). खुद्द आरोग्यमंत्रीच रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत आहेत. स्वतः कोरोनाशी लढा देत असताना त्यांना आता जनतेची चिंता अधिक वाटू लागली आहे. त्यामुळे रुग्णालयातूनच त्यांनी नागरिकांसाठी पत्र लिहिलं आहे आणि कळकळीचं आवाहन केलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. 18 फेब्रुवारीला त्यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याला कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी धडपडणारे आरोग्यमंत्री स्वतःच कोरोनाच्या विळख्या सापडले त्यानंतर त्यांनी जनतेला पत्र लिहिलं आहे.

राजेश टोपे यांनी पत्रात लिहिलं आहे की, "गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक करोना योद्धे विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो. पण अद्याप करोना गेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे"

"मी सध्या रुग्णालयात कोरोनाविरुद्ध लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो, कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या, परंतु कोरोनाला माझ्या जवळ येणं जमलं नाही. पण अखेर त्याने मला गाठलंच. मात्र आपल्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हरवून पुन्हा एकदा कोरोना विरुध्दच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार आहे", असं आरोग्यमंत्री म्हणाले.

हे वाचा - मंत्रालयात पुन्हा खळबळ, एकाच विभागात 8 कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

"समजदार, संवेदनशील आणि सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे . म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही. लॉकडाऊन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे. तेव्हा आपणास माझं कळकळीचं आवाहन राहिल की, मास्क,सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा आणि लॉकडाऊन टाळा", असं कळकळीची विनंती राजेश टोपे यांनी केली आहे. एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने कोरोनाला हरवूया, असा निर्धारही त्यांनी केला आहे.

हे वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेन; Covid-19 अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक

लॉकडाऊननंतर राबवण्यात येत असलेल्या अनलॉक प्रक्रियेनंतर बंद करण्यात आलेल्या विविध गोष्टी पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे साहजिकच मंत्र्यांची लोकांमधील उठबसही वाढली. परिणामा आता ठाकरे सरकारमधील मंत्रीच कोरोना पॉझिटिव्ह आढळू लागले आहेत. अलिकडेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील आणि मंत्री राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर राजेश टोपे यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid-19 positive, Maharashtra, Rajesh tope