मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune Hotel Beaten Case : 'ओ शेठ'ला दिला 'साहेबांनी' चोप, मोफत सूपच्या ऑफरवरून पुण्यात तुफान राडा

Pune Hotel Beaten Case : 'ओ शेठ'ला दिला 'साहेबांनी' चोप, मोफत सूपच्या ऑफरवरून पुण्यात तुफान राडा

पुण्यात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. कोयता गँगचा विषय गाजत असताना आता नवीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. कोयता गँगचा विषय गाजत असताना आता नवीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. कोयता गँगचा विषय गाजत असताना आता नवीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 09 फेब्रुवारी : पुण्यात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. कोयता गँगचा विषय गाजत असताना आता नवीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील दोन हॉटेल मालकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. मोफत सूप देण्यावरून एका हॉटेल मालकाने चक्क मोफत सूप देणाऱ्या हॉटेल मालकाला चाकूने भोसकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत हॉटेल मालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका हाॅटेल चालकाने आपल्या हाॅटेलमधील ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी सूप माेफत देण्याची याेजना सुरू केली. या योजनेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. याचा परिणाम शेजारी असणाऱ्या हॉटेल्सवर होत असल्याचे दिसून आले.

हे ही वाचा : Nashik Koyta Gang : बहिणीची छेड, जाब विचारायला गेलेल्या तरुणासोबत भयानक कृत्य; नाशिकमध्येही कोयता गँगची दहशत

यामुळे आपल्या हाॅटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी होत असल्याचे दुसऱ्या हाॅटेल चालकाच्या लक्षात आले. या रागातून मोफत सूप देणाऱ्या हॉटेल मालकाला थेट मारहाण करत धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले.

याप्रकरणी खडकी पाेलिस ठाण्यात सिद्धार्थ भालेराव, दिग्विजय गजरे (रा.खडकी, पुणे) यांच्यावर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आराेपीविराेधात मुलायम रामकृपाल पाल (27, रा.खडकी, पुणे) यांनी पाेलिसांत तक्रार दिली.

ही घटना मागच्या दोन दिवसापूर्वी (दि.06) फेब्रुवारी राेजी मेवाड पावभाजी सेंटरसमाेर चाैपाटी खडकी येथे घडली. तक्रारदार मुलायम पाल यांचे संबंधित ठिकाणी ओ शेठ नावाचे हाॅटेल काढले आहे. त्यांच्या हाॅटेलजवळच आराेपींचे साहेब नावाचे हाॅटेल आहे.

तक्रारदारांनी त्यांच्या हाॅटेलमध्ये ग्राहकांची संख्या वाढण्यासाठी जेवणाआधी माेफत सूप देण्याची याेजना सुरू केली हाेती. त्यामुळे ग्राहक माेठ्या प्रमाणात त्यांच्याकडे वळले, तर दुसऱ्या हाॅटेलमधील ग्राहकांची संख्या कमी हाेऊ लागली.

हे ही वाचा : लेकरांना जपा! 4 वर्षांची चिमुकली पाचव्या मजल्यावरून पडून मृृत्यू, सांगलीतील घटना

याचा राग मनात धरून आराेपी सिद्धार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे यांनी मुलायम पाल यांना लाेखंडी धारदार हत्याराने जखमी केले. तक्रारदार हॉटेल चालकावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून खडकी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

First published:

Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune crime, Pune crime news, Pune police