मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्याजवळच्या गावात होळीला मुलंच होतात देव; 250 वर्षांची परंपरा असलेलं अनोखं धुलिवंदन

पुण्याजवळच्या गावात होळीला मुलंच होतात देव; 250 वर्षांची परंपरा असलेलं अनोखं धुलिवंदन

लहान मुलांनाच इथे वीर देवाचा दर्जा दिला जातो. पाहा धुलिवंदनाच्या दिवशीच्या पारंपरिक उत्सवाचा VIDEO

लहान मुलांनाच इथे वीर देवाचा दर्जा दिला जातो. पाहा धुलिवंदनाच्या दिवशीच्या पारंपरिक उत्सवाचा VIDEO

लहान मुलांनाच इथे वीर देवाचा दर्जा दिला जातो. पाहा धुलिवंदनाच्या दिवशीच्या पारंपरिक उत्सवाचा VIDEO

    पुणे, 29 मार्च : देशभरात सोमवारी धुलिवंदन साजर झालं. सर्वसाधारणपणे माती, चिखलात खेळायची पारंपरिक सणाची कल्पना. पण आता मात्र बहुतेक ठिकाणी हाच रंगांचा उत्सव म्हणून साजरा होतो. रंग खेळून धुलिवंदन किंवा होळी साजरी करायची परंपरा माहीत असेल. पण पुण्याजवळच्या या गावात मात्र  आगळीच परंपरा आहे. एक-दोन नव्हे 250 वर्षाची ही परंपरा आहे. धुलिवंदनाच्या दिवशी गावातली लहान मुलंच देव होतात आणि त्यांची अनोखी मिरवणूक निघते.

    काही गावात वर्षानुवर्षे आपले सण वेगळ्या पद्धतीने साजरे करून आपली परंपरा जतन करत आहेत. जुन्या परंपरा जिवंत ठेवण्याचं काम ग्रामस्थांकडून केलं जात आहे. अशीच एक अनोखी परंपरा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे गावात पाहायला मिळाली.

    शिरदाळे गाव आंबेगाव तालुक्यातील पूर्व पट्ट्यात असलेलं आणि डोंगरावर वसलेले छोटंसं गाव आहे. आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या गावात परंपरेनुसार सायंकाळी लहान मुलांना देवाचा दर्जा देऊन त्यांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. गेली दोनशे ते अडीचशे वर्षांपासून धुलिवंदन सणाच्या निमित्ताने ही वेगळी मिरवणूक काढायची परंपरा ग्रामस्थांनी आजही चालू ठेवली आहे.

    वाचा- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी : संकष्टी चतुर्थीला गणेश मंदिरे बंद राहणार

    धुलिवंदन या सणाचे औचित्य साधत सर्व ग्रामस्थ एकत्र येत हा सण साजरा करण्यात आला. कोरोनाच्या साथीमुळे खरं तर बऱ्याच सणांवर विरजण आलं आहे. मात्र शासनाचे सर्व नियम पाळत ग्रामस्थांच्या सहकार्याने या वर्षी हा सण सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत साजरा करत गावच्या एकोप्याचे उत्तम दर्शन दिले.

    लहान मुलांना या दिवशी 'वीर' देवाचा दर्जा देऊन सजवलं जातं. हातात पायात चाफ्याच्या फुलांची माळ, हातात काठी आणि देवाच्या तळीभंडाराचे ताट असा पेहराव करून सजावट करून त्यांची गावातून  मिरवणूक काढून पारंपरिक ढोल लेझिमचा फेर धरला जातो.

    'मिसळीबरोबर पाव की ब्रेड' यावर माहिश्मतीला होणार युद्ध, पाहा काय 'कट' शिजतोय कट

    शेकडो वर्षांची ही परंपरा आजही शिरदाळे सारख्या आपल्या छोट्या गावात जपली जाते. गावातील सर्व ग्रामस्थ तसंच पुणे मुंबईवरून दरवर्षी या सणासाठी आवर्जून पाहुणे येत असतात. मात्र या वर्षी कोरोना संकटामुळे बाहेरगावाहून फार कुणी येऊ शकलं नाही.

    First published:

    Tags: Holi, Holi 2021, Maharashtra, Mumbai, Pune