मुंबई, 29 मार्च- मिसळ हा तमाम मराठी जनांचा वीक पॉइंट. पण कुठली मिसळ बेस्ट (best Misal) यावर कुठेही, कधीही, कुणाबरोबरही वाद घालू शकेल तोच खरा मराठी माणूस. प्रत्येकाला आपापल्या गावची स्पेशल मिसळ जगात भारी वाटते हे खरं. पण सध्या सोशल मीडियावर मिसळीबाबतचा वेगळाच वाद सुरू आहे. मिसळीबरोबर पाव खायचा की ब्रेड स्लाइस? आता या वादावरून चक्क युद्ध होणार आहे, तेही बाहुबलीच्या माहिश्मतीमध्ये... Instagram वर भाडिप- अर्थात भारतीय डिजिटल पार्टीने (Bhadipa instagram account) टाकलेल्या एका भन्नाट VIDEO ची चर्चा जोरात आहे.
सोशल मीडियावर बाहुबली मधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र त्या पात्रांच्या तोंडात इतके मजेशीर संवाद बसविण्यात आले आहेत. की ते ऐकून तुम्हीसुद्धा पोट धरून हसायला लागाल. या व्हिडीओ मध्ये बाहुबलीच्या कलाकारांमध्ये मिसळ साठी युद्ध चालू असल्याचं दाखवण्यात आलं आहे. राणी शिवगामी विचारते आत्ता मधेच कोणत्या युद्धाची तयारी सुरू केली आहे. त्यावर तिचा प्रधान म्हणतो मिसळीसोबत पाव खायचा की ब्रेड या मुद्द्यावर राज्यात वाद सुरु आहे. आणि त्यातच दोन गटसुद्धा पडले आहेत. आणि त्यासाठी होणाऱ्या युद्धाची ही तयारी सुरु आहे.
View this post on Instagram
तसेच या मुद्द्यावर शिवगामीचा नवरा म्हणतो या सोशल मीडियावर होणाऱ्या थुकार वादांसाठी आता आपल्या राज्यात युद्ध करायचं का? यावर प्रधान म्हणतो ओ मला कशाला ओरडताय तुमच्या त्या भावांनीच या युद्धाची तयारी केली आहे. त्यावर शिवागामी विचारते पण नेमकं झालं तरी काय? यावर प्रधान म्हणतो परवा एका ग्रुपवर मिसळसोबत पावखायचा का ब्रेड असा वाद चालू होता. त्यात एकानं म्हटलं की चपाती खायची. मग त्याला धरून सगळ्यांनी कटात बुडवून मारला. आणि मग याचा निर्णय करायचंच असं ठरवलं. पाव खाणाऱ्या माणसांनी म्हटलं जर मिसळ ब्रेड बरोबरचं खायची असती तर त्याला मिसळपाव का म्हटलं असतं. आणि ब्रेड खाणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे, पावात काय आहे असं शेक्सपिअर आधीच सांगून गेलाय. त्यामुळे हे शाब्दिक युद्ध ण करता मैदानात याचा निर्णय करण्याचं ठरवण्यात आलं आहे.
(हे वाचा: राज कपूर यांच्या 'Holi party' मध्ये अभिताभ बच्चन यांनी घातला होता धिंगाणा.... )
यावर शिवागामी विचारते पण हे युद्ध नेमकं होणार कसं, यावर प्रधान म्हणतो, युद्धभूमीवर एका बाजूला पाव असतील तर एका बाजूला ब्रेड असतील. आणि दोन्ही गटातील लोकं आपापली आवडती गोष्ट खाण्यासाठी पुढं येतील. आणि कोण किती खातं यावर विजेता घोषित करण्यात येईल. यावर शिवागामी म्हणते कटप्पा दोन्ही गटात मिसळीचा कट समान वाटा.यावर प्रधान म्हणतो दोन्ही भावात जो जिंकेल त्यालाच या महिषमती राज्यात कटप्पा मिसळ सेंटर सुरु करण्यास परवानगी मिळेल.
असा हा मजेशीर व्हिडीओ करण्यात आला आहे. कोणीही विचारसुद्धा केला नसेल की बाहुबलीच्या त्या गंभीर दृश्यावर असं काही करता येऊ शकतं. असा आगळावेगळा प्रयोग केला आहे रांगड्या कोल्हापूरच्या सुमित पाटील यानं. याआधीही सुमितने अनेक चित्रपटांच्या दृश्यांवर असे मिम्स केले आहेत. तसेच त्याचे प्रत्येक व्हिडिओ सर्वांना पोट धरून हसायला भाग पाडतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.