पुण्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर! ससूनमध्ये एका बेडवर तीन रुग्णांवर उपचार सुरू

Corona cases in Pune: पुण्यातील ससून रुग्णालयात कॅज्युअल्टी वार्डमधील कोरोना रुग्णांची भयानक परिस्थिती समोर आली आहे. याठिकाणी एकाच बेडवर प्रत्येकी तीन-तीन रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत.

Corona cases in Pune: पुण्यातील ससून रुग्णालयात कॅज्युअल्टी वार्डमधील कोरोना रुग्णांची भयानक परिस्थिती समोर आली आहे. याठिकाणी एकाच बेडवर प्रत्येकी तीन-तीन रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत.

  • Share this:
पुणे, 16 एप्रिल:  मागील काही काळापासून महाराष्ट्रातील कोरोना स्थिती (Corona pandemic) अधिक बिकट बनत चालली आहे. राज्यात दररोज वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांमुळे (Corona patients) राज्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होतं आहे. परिणामी अनेक रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. पुणे शहरातही कोरोना रुग्णांची स्थिती अत्यंत वाईट बनत चालली आहे. पुण्यासहित राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असून अनेक रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागत आहे, तर काहींना जमिनीवर पडून उपचार घ्यावे लागत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे (Increasing number of Corona Patients) पुण्यातील खाजगी आणि शासकीय आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आल्या आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) कॅज्युअल्टी वार्डमधील आणखीच भयानक परिस्थिती समोर आली आहे. याठिकाणी एकाच बेडवर प्रत्येकी तीन-तीन रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. विशेष म्हणजे कॅज्युअल्टी वॉर्डची रुग्ण क्षमता 40 एवढी आहे. पण ससूनमध्ये दररोज 60 नवीन कोरोना रुग्ण येत आहेत. याची वाढीव ताण या वॉर्डवर पडत आहेत. ससूनमध्ये नवीन रुग्ण दाखल झाल्यानंतर या वॉर्डातील रुग्ण हॉस्पिटलमध्ये इतरत्र हालवली जात आहे. ज्यामध्ये रुग्णांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन कारावा लागत आहे. (हे वाचा-मोठी बातमी, पुण्यात lockdown ठरला फायदेशीर, कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण घटले!) पुण्यातील ससून रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळाचा दुहेरी फटका रुग्णांना आणि नर्सेसना बसत आहे. दररोज नव्याने होणाऱ्या रुग्णवाढीचा अतिरिक्त ताण ससूनमधील नर्सेसवर देखील येत आहे. पुण्यातील कोरोना रुग्णवाढ हा राज्यासमोरील एक प्रमुख प्रश्न आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याच्या बाबतीत पुणे शहर पहिल्या काही शहरांमध्ये आहे. देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यापासून पुण्यातील आरोग्य यंत्रणा कंबर कसून लढत आहे, मात्र आरोग्य यंत्रणेवरील प्रचंड ताणामुळे ही व्यवस्था कुठेतरी कोलमडताना दिसत आहे. (हे वाचा- या दोन बातम्यांनी पुणेकरांवरचं संकट झालं दूर) सध्या पुणे शहरात लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. पण गेल्या आठवड्यापासून पुण्यातही रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता. पण अलीकडेच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आपले वैयक्तिक संबंध वापरून पुणेकरांसाठी 3500 रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळवले आहेत.
Published by:News18 Desk
First published: