Corona संकटात पुणेकरांसाठी आल्या 2 Good News, पाहा काय आहेत

Corona संकटात पुणेकरांसाठी आल्या 2 Good News, पाहा काय आहेत

सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. कुठे बेड्स उपलब्ध नाहीत तर कुठे औषध, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, या संकटात पुणेकरांना दिलासा देणाऱ्या बातम्या आल्या आहेत.

  • Share this:

पुणे, 15 एप्रिल : पुणेकरांची (Pune) आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती म्हणजे रेमडेसिवीरच्या आंदोलनाने... आपल्या पेशंट्चा जीव वाचावा, यासाठी गेली दोन दिवस शहरभर वणवण फिरूनही रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir Injection) न मिळाल्यामुळे नातेवाईकांनी भल्या पहाटेच थेट पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि तिथंच ठिय्या (Protest outside Collector office) मांडला. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दाखवताच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Rajesh Deshmukh) अँक्शन मोडमध्ये आले. त्यांनी आपले वैयक्तिक संबंध वापरून थेट दिल्लीहून तात्काळ 3500 रेमडेसिवीर इंजेक्शन मागवून घेतली (3500 Remdesivir injection) ती सुद्धा विमानाने. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यात खरंतर सगळीकडेच रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. राज्य सरकारकडेही स्टॉक उपलब्ध नाहीये. त्यामुळे पुण्यातील कोरोना रूग्णांचे जीव वाचवायचे तरी कसे, हा प्रश्न जिल्हा प्रशासनाला सतावत होता. त्यातच रूग्णांचे नातेवाईक हे असे रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे करायचे तरी काय हा प्रश्न प्रशासनाला पडला होता. अशातच दिल्लीत निर्यात स्टॉकमधील 3500 रेमडेसिवीर दिल्लीत पडून असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी तात्काळ आपले व्यक्तिगत संबंध वापरून तो स्टॉक पुणेकरांसाठी बूक करून विमानाने मागवून घेतला आणि दोन्ही पालिकांच्या ताब्यात दिला.

दोन्ही पालिकांच्या हॉस्पिटल्सला रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाल्याने अनेक गरजू रूग्णांचे जीव वाचू शकतील विशेष म्हणजे ज्या रूग्णांच्या नातेवाईकांनी कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन केलं होतं त्यांनाही हॉस्पिटल मार्फत तात्काळ इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसंच पुण्यात आजतरी कुठेही ऑक्सिजनचा तुटवडा नसून भविष्यातील वाढती डिमांड लक्षात घेऊन नियोजन हाती घेतल्याचं पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी न्यूज 18 लोकमत शी बोलताना सांगितलं.

वाचा: मोठी बातमी, पुण्यात lockdown ठरला फायदेशीर, कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण घटले!

पुणेकरांसाठी आणखी एक गुड न्यूज....

पुण्यात रूग्णांना बेड्स मिळत नसल्याने अनेक रूग्णांना बेड्सअभावी जीव गमावावा लागत होता. म्हणूनच जिल्हा प्रशासवाने ससून रुग्णालयातील आणखी 300 बेड्स कोविड रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ससूनमधील कोविड बेड्सची संख्या 500 वरून 800 वर जाणार आहे. येत्या दोन तीन दिवसात हे जास्तीचे बेड्स उपलब्ध होतील. ससूनचे डीन डॉ. मुरलीधर तांबे आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

गेले अनेक दिवस पुणे मनपाकडून ससूनचे बेड्स वाढवण्याची मागणी होत होती पण पुढे त्यासाठी काहीच हालचाली होत नव्हत्या. यामुळेच पुण्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांनी आज स्वत: ससून हॉस्पिटलला भेट देऊन त्यांच्या वाढीव मनुष्यबळ आणि इतर समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले तेव्हा कुठे ससूनचं प्रशासन बेड्स वाढवण्यास तयार झालं. ससून हॉस्पिटलमध्ये एकूण 1400 बेड्स असून त्यापैकी फक्त 526 बेड्स कोविडसाठी दिले जात होते त्यामुळे वाढीव रूग्णसंख्येचा ताण हा पालिकेवर पडत होता. पण आता ससूनमधीन आणखी 300 ऑक्सिजनयुक्त बेड्स कोविडसाठी मिळणार असल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय. थोडक्यात पुणेकरांची सकाळ रेमडेसिवीर आंदोलनाने सुरू झाली असली तर दुपारपर्यंत जिल्हा प्रशासनाने या दोन्ही समस्यांची काही प्रमाणात सोडवणूक करून कोविड रूग्णांना काहिसा दिलासा दिलाय, असं म्हणायला काहीच हरकत नाही.

First published: April 15, 2021, 10:46 PM IST

ताज्या बातम्या