• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या, महिन्यभरापूर्वीच ठरले होते लग्न!

पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या, महिन्यभरापूर्वीच ठरले होते लग्न!

दीपाली या वसई येथील पोलीस स्टेशनमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होती. दीड महिन्यापूर्वी तिचे लग्न भोसरी येथील तरुणाशी ठरले होते.

दीपाली या वसई येथील पोलीस स्टेशनमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होती. दीड महिन्यापूर्वी तिचे लग्न भोसरी येथील तरुणाशी ठरले होते.

दीपाली या वसई येथील पोलीस स्टेशनमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होती. दीड महिन्यापूर्वी तिचे लग्न भोसरी येथील तरुणाशी ठरले होते.

 • Share this:
  सुमित सोनावणे, प्रतिनिधी दौंड, 03 नोव्हेंबर : सर्वत्र दिवाळीची (diwali) धामधूम सुरू आहे. दिवाळीच्या सणातही पोलीस कर्मचारी आपलं कर्तृव्य पार पाडत आहे. पण पुणे (pune) जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या (police officer) त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने ( female police officer committed suicide) राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील देलवडी या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. दीपाली बापूराव कदम (deepali kadam suicide) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप करीत महिला पोलिसाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तो आला, बसला.. नजरा मात्र तिच्यावरच अडल्या..', अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत दीपाली या वसई येथील पोलीस स्टेशनमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होती. दीड महिन्यापूर्वी तिचे लग्न भोसरी येथील तरुणाशी ठरले होते. दरम्यान आरोपी वाल्मिक गजानन आहिरे हा दिपालीला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता. लग्न जमल्यानंतर सासरच्या मंडळींना आरोपी वाल्मिक आहिरे याने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा विवाहित होता. तरीही दीपालीला वारंवार त्रास देत होता. दीपालीच्या भावाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने त्यालाही दमबाजी करून जीवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून दिपालीने देलवडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी वाल्मिक गजानन आहिरे याच्यावर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच! न्यूझीलंड सीरिजपासून नवी इनिंग सुरू वाल्मिक आहिरे हा पालघर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहे. मृत दीपालीच्या भावाने यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी वाल्मिक आहिरे विरोधात कलम 306,504,506 नुसार यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  Published by:sachin Salve
  First published: