• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • BREAKING : राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच! न्यूझीलंड सीरिजपासून नवी इनिंग सुरू

BREAKING : राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच! न्यूझीलंड सीरिजपासून नवी इनिंग सुरू

राहुल द्रविड याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक (Rahul Dravid Team India Coach) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 3 नोव्हेंबर : राहुल द्रविड याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक (Rahul Dravid Team India Coach) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या भारतात होणाऱ्या सीरिजपासून राहुल द्रविड नवी जबाबदारी सांभाळेल. 17 ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी-20 आणि टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ या टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे, त्यामुळे बीसीसीआय नवीन प्रशिक्षकाच्या शोधात होती. राहुल द्रविड टीमचा मुख्य कोच होईल, हे जवळपास निश्चित झालं होतं. पुढच्या दोन वर्षांसाठी राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच असेल. या दोन वर्षांमध्ये टीम इंडिया आणखी एक टी-20 वर्ल्ड कप आणि वनडे वर्ल्ड कप खेळणार आहे. राहुल द्रविड याआधी टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून गेला होता. भारताचे मुख्य खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे राहुल द्रविडला ही जबाबदारी देण्यात आली होती. टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक होण्यासाठी द्रविड सुरुवातीला फारसा इच्छुक नव्हता, पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडला कोच होण्यासाठी तयार केलं, यानंतर त्याने या पदासाठी अर्ज भरला. राहुल द्रविड कोच झाला असला तरी भारताचा बॉलिंग कोच, बॅटिंग कोच आणि फिल्डिंग कोच कोण होणार, याबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाही. सध्याचे टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनीही या पदासाठी अर्ज केला आहे. तसंच राहुल द्रविडचे विश्वासू सहकारी पारस म्हांब्रे यांनी बॉलिंग कोचसाठी अर्ज केला आहे. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडियाला नवा कॅप्टनही मिळणार आहे. विराट कोहलीने टी-20 वर्ल्ड कपनंतर आपण या फॉरमॅटमध्ये कॅप्टन्सी करणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे.
  Published by:Shreyas
  First published: