जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तो आला, बसला आणि गेला पण नजरा मात्र तिच्यावरच अडल्या..', मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'तो आला, बसला आणि गेला पण नजरा मात्र तिच्यावरच अडल्या..', मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'तो आला, बसला आणि गेला पण नजरा मात्र तिच्यावरच अडल्या..', मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

राजेश्वरी खरातची “रेडलाईट एक विदारक सत्य” हि शॉर्ट फिल्म लवकरच रिलीज होणार आहे. यानिमित्त सोशल मीडियावर तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,3 नोव्हेंबर- फँड्री फेम मराठमोळी अभिनेत्री राजेश्वरी खरात **(rajeshwari kharat)**सोशल मीडियावर नेहमी तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. राजेश्वरी खरातची “रेडलाईट एक विदारक सत्य” हि शॉर्ट फिल्म लवकरच रिलीज होणार आहे. यामध्ये राजेश्वरी खरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या पात्रात पाहायला मिळणार आहे. यानिमित्त सोशल मीडियावर तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. राजेश्वरी खरातने इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की,तो आला, बसला, आणि गेला पण सर्वांच्या नजरा मात्र तिच्यावरच अडल्या…. स्त्रीने असे काम करने योग्य नवे परंतु पुरुषाने केलेले अतिउत्तम. काही काम धंदा का करीत नाहीस, फक्त पैश्यांसाठी लाचारीचे सोंग घेतीस. पण तुम्ही तुमच्या घरात धुणे भांड्याचे तरी काम देताल का एवढेच सांगा, आणि जरी काम दिले तरी त्या मागचा हेतू हा सर्वांनाच माहिती असतो.

जाहिरात

गल्लीकडे येतांना तोंड लपवून येतात पण येतात मात्र नक्की. थोडावेळसाठी च खेळण घेतल्यासारखं आमची आबरू काढून घेता आणि मोबाईल च्या रिचार्ज पेक्षा कमी किम्मत देता. सर्वांना हे खेळण आयुष्यात एकदातरी पाहिजे असतच पण कोणी याला कायमच आपलं करून घेण्याची हिम्मत ठेवतात का? नाही, कारण वेश्या व्यवसाय करणारी स्त्री चारित्र्यहीन असते आणि बाकीचे सर्व अगदीच पवित्र असतात. वाचा :  Real फटाका! प्राजक्ताने असा फोटो शेअर करून दिली कॅप्शन की…. समाजात आणखी बर्‍याच काही गोष्टी वेश्येबद्दल बोलल्या जातात पण कोणी मात्र कधी त्यांच्या हितात बोलत नाही, सर्वजण फक्तं ऐकुन मजा घेतात.कृपया थोडीफार दया त्यांच्यावरही करा ज्या आपल्या घरातील माता भगिनींसारखे आयुष्य कधीच जगू शकत नाहीत, अशी पोस्ट तिनं केली आहे. यासोबत तिनं काही फोटो देखील शेअर केले आहेत. वाचा :  बिग बॉसच्या घरातील हे पाच स्पर्धक आहेत महेश मांजरेकरांचे मोस्ट फेव्हरेट! दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री सिनेमातील सोज्वळ शालू प्रेक्षकांना खूपच भावली. राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे. राजेश्वरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते.  राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत. तिचे सोशल माध्यमावर लाखो फॉलोअर्स आहेत. ती चाहत्यांना अनेकदा आपल्या बेधडक शैलीत उत्तरं देखील देते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात