जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Gudi Padwa 2023 : पाडव्याला विशेष महत्त्व असलेली साखरेची गाठ कशी तयार होते? पाहा Video

Gudi Padwa 2023 : पाडव्याला विशेष महत्त्व असलेली साखरेची गाठ कशी तयार होते? पाहा Video

Gudi Padwa 2023 : पाडव्याला विशेष महत्त्व असलेली साखरेची गाठ कशी तयार होते? पाहा Video

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष महत्त्व असलेली साखरगाठ कशी तयार होते हे माहिती आहे का?

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

    नीलम काराळे, प्रतिनिधी पुणे, 18 मार्च : मराठी नववर्ष दिन म्हणजेच गुढीपाडवा आता काही दिवसांवर आलाय. घरोघरी त्याची तयारी सुरू झालीय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठही सजली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याबरोबरच साखरगाठीचं महत्त्व आहे. विशेषत: घरातील लहान मुलांना या साखरगाठींचा हार आवर्जून देण्यात येतो. त्याचबरोबर देवाला आणि गुढीलाही ही साखरगाठ अर्पण केली जाते. ही साखरगाठ कशी बनते हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग पुण्यातील एका कारखान्यातून ही आपण माहिती घेऊया कशी बनते साखरगाठ? पुण्यातील भवानी पेठ येथे गणेश डिंबळे यांचा साखर गाठ आणि तिळगुळ बनवण्याचा कारखाना आहे. दरवर्षी महाशिवरात्रीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणावर साखर गाठी बनवल्या जातात. गणेश यांनी ही साखरगाठ कशी तयार होते याबबाबत माहिती दिली आहे. ‘आम्ही पन्नास वर्षांपासून या व्यवसायात आहोत. पुण्यातील तसंच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना आमच्याकडील साखरगाठी दिल्या जातात. आम्ही सुरूवातीला चांगल्या प्रकारचा पाक बनवतो. तो पाक तयार झाल्यानंतर आमच्याकडं साखरगाठीचे वेगवेगळे साचे तयार आहेत. त्या साच्यामध्ये तो पाक ओततो. त्यामध्ये एक बारीक दोरी टाकतो. पाक घट्ट झाल्यानंतर साचा उघडतो. या पद्धतीनं ही साखरगाठ तयार होते,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. नऊवारी नेसून मराठमोळ्या पद्धतीनं साजरा करा पाडवा, पाहा तुम्हाला कोणती साडी आवडतेय? Video आम्ही छोट्या साखरगाठी पासून ते पाच किलोच्या साखरगाठी पर्यंत साखरगाठी बनवतो. आमच्या इथे दररोज गुढीपाडव्याच्या सीजनमध्ये 400 ते 500 किलो साखरगाठी विकल्या जातात. एक किलो साखरगाठीची किंमत 90 रुपये आहे. गुढीपाडव्याला साखरगाठीचं विशेष महत्त्व आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    जेजुरीचा खंडोबा, तुळजाभवनी, दगडूशेठ गणपती, चतु:श्रृंगी देवी या प्रमुख देवस्थांनांसाठी पाच किलोची मोठी साखर गाठ आम्ही बनवतो. आमच्याकडं शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यासह उत्तर प्रदेशातून खास कारगीर साखरगाठ बनवण्यासाठी येतात. पुण्यात तसंच इतर ठिकाणीही होलसेल मार्केटमध्ये आमच्या साखरगाठी जातात. या साखरगाठींवर विशिष्ट डिझाईन असते. ही डिझाईन विविध ग्रहांच्या आकाराच्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं बनवल्या जातात, अशी माहिती गणेश यांनी दिली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात