मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Gudi Padwa 2023 : नऊवारी नेसून मराठमोळ्या पद्धतीनं साजरा करा पाडवा, पाहा तुम्हाला कोणती साडी आवडतेय? Video

Gudi Padwa 2023 : नऊवारी नेसून मराठमोळ्या पद्धतीनं साजरा करा पाडवा, पाहा तुम्हाला कोणती साडी आवडतेय? Video

X
Gudi

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याच्या दिवशी मिरवण्यासाठी नऊवारी साडीचे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याच्या दिवशी मिरवण्यासाठी नऊवारी साडीचे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नुपूर पाटील, प्रतिनिधी

  मुंबई, 17 मार्च : मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा आता जवळ आला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी नऊवारी साडी अनेक महिला नेसतात. अगदी परदेशात स्थायिक झालेल्या महाराष्ट्रायन महिला देखील या दिवशी नऊवारी अभिमानानं मिरवतात. या दिवशी निघणारी शोभा यात्रा तसंच विविध सांस्कृतीक कार्यक्रमासाठी नऊवारी साडीला पसंती असते. मुंबईतील मार्केटमध्ये पाडव्यानिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवारी साडी दाखल झाल्या आहेत.

  कोणत्या साड्या उपलब्ध?

  दादरच्या मार्केटमध्ये विविध प्रकारच्या नऊवारी साड्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये मस्तानी नऊवारी , शाही मस्तानी नऊवारी , डबल काष्टी नऊवारी , सिंगल काष्टी नऊवारी, अशा प्रकारच्या साड्या विविध रंगांमध्ये, डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला हवी त्या साईजची साडी इथं मिळते. या साड्यांवर सुंदर मोर तसंच बुट्टा डिझाईन आहे. या प्रत्येक साडीचा काठही आकर्षक आणि उठावदार दिसतो.

  गुढीपाडव्याला हवाय इतरांपेक्षा वेगळा ड्रेस? 'इथं' संपेल तुमचा शोध,Video

  काय आहे किंमत?

  ही नऊवारी साडी रेडी टु वेअर आहे. संपूर्ण काष्टा तयार असतो. पदराच्या प्लेट्स तयार करून नेसण्याइतकी ती तयार केलेली आहे. ही साडी 2000 ते 2500 रुपयांच्या आत दादर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तसेच 15 वर्षाच्या पुढील मुली च महिलांसाठी ही साडी तयार करून मिळते.

  लेझीमसाठी खास नऊवारी

  गुढीपाडवा हा मराठी सण असल्यामुळे या दिवशी महाराष्ट्रीयन नृत्य प्रकार म्हणजे लेझिम नृत्य सादर केलं जात. बरेच ग्रुप हे नृत्य सादर करतात. त्यासाठी कोल्हापुरी साडी नेसली जाते. नऊवारीचा हा प्रकार सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. लेझिम नृत्यासाठी खासकरून या साडीला जास्त मागणी आहे.गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी महिला दादर मार्केटमध्ये येताहेत. त्यांच्यासाठी आम्ही सगळेच प्रकार आणि साईजच्या सा़ड्या तयार ठेवल्या आहेत,  असं विक्रेत्या पूजा चंद्रा यांनी सांगितलं.

  गुढीपाडव्याला मुलीसाठी करा मस्त खरेदी, मुंबईच्या मार्केटमधील पाहा नवी फॅशन, Video

  गूगल मॅपवरून साभार

  कुठे मिळेल नऊवारी साडी?

  भगवान कट पीस,रानडे रोड, पोस्ट ऑफिसच्या समोर,दादर पश्चिम.

  First published:

  Tags: Gudi Padwa 2023, Lifestyle, Local18, Mumbai, Shopping