Home /News /pune /

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; कारला गॅस टँकरची धडक, 3 जणांचा जागीच मृत्यू

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; कारला गॅस टँकरची धडक, 3 जणांचा जागीच मृत्यू

Mumbai-Pune Expressway Accident: पुण्यातून (Pune) एक भीषण अपघाताची बातमी समोर येतेय. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर (Pune-Mumbai Expressway) गॅसचा टँकर पलटी झाला आहे.

    पुणे, 09 मे: पुण्यातून (Pune) एक भीषण अपघाताची बातमी समोर येतेय. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर (Pune-Mumbai Expressway) गॅसचा टँकर पलटी झाला आहे. खंडाळा (Khandala Ghat) घाटातील खोपोली (Khopoli) एक्झिटजवळील तीव्र उतारावर भीषण अपघात झाला आहे. यामुळे मुंबई आणि पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक मंदावली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच (Three People Died) मृत्यू झाला आहे. गॅस टॅंकरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर पुढे जाणाऱ्या दोन कारवर आदळून तो विरुद्ध दिशेला मुंबई-पुणे मार्गावर जाऊन पलटी झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन ते चार जण गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर टँकरला तीन गाड्या पाठोपाठ धडकल्याने यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात होता. त्यावेळी खोपोली एक्झिटजवळ हा टँकर उलटला. घटनेनंतर बोरघाट पोलीस यंत्रणा, IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आदींनी घटनास्थळी धावा घेत मदतकार्य युद्धपातळीवर सुरु केलं आहे. संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, ''आणखी घोटाळे...'' हा अपघात आज सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता झाला आहे. या भीषण अपघातामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही विस्कळीत झाली आहे. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजली नाही. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहे. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत आहे. दरम्यान जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सोडणार नाही, ध्येय गाठणारचं! पठ्ठ्यानं 194.5 वरून 94 किलो करून दाखवलं; असा होता आहार यंत्रणेकडून अपघातग्रस्त दोन्ही कार बाजूला करण्यात आल्या असून, गॅस टॅंकरला सुरक्षितरित्या बाजूला करण्यासाठी संबंधित गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. कंपनीचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अपघातग्रस्त टॅंकर बाजूला केला जाईल.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Accident, Mumbai pune expressway, Pune (City/Town/Village), Pune accident

    पुढील बातम्या