मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सोडणार नाही, ध्येय गाठणारचं! पठ्ठ्यानं 194.5 वरून 94 किलो करून दाखवलं; असा होता आहार

सोडणार नाही, ध्येय गाठणारचं! पठ्ठ्यानं 194.5 वरून 94 किलो करून दाखवलं; असा होता आहार

फास्ट फूड खाण्याची खूप आवड होती. पोट भरेपर्यंत ते असे पदार्थ खात राहायचे. अनिरुद्धचे मित्र अनेक वेळा त्याची खाण्यावरून चेष्टा करायचे, पण ते दुर्लक्ष करून खाण्यावर जोर द्यायचे.

फास्ट फूड खाण्याची खूप आवड होती. पोट भरेपर्यंत ते असे पदार्थ खात राहायचे. अनिरुद्धचे मित्र अनेक वेळा त्याची खाण्यावरून चेष्टा करायचे, पण ते दुर्लक्ष करून खाण्यावर जोर द्यायचे.

फास्ट फूड खाण्याची खूप आवड होती. पोट भरेपर्यंत ते असे पदार्थ खात राहायचे. अनिरुद्धचे मित्र अनेक वेळा त्याची खाण्यावरून चेष्टा करायचे, पण ते दुर्लक्ष करून खाण्यावर जोर द्यायचे.

नवी दिल्ली, 09 मे : हा फोटो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहे. खरंच इतकं वाढलेलं वजन कमी करता येऊ शकतं, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. डॉ. अनिरुद्ध यांनी ज्या पद्धतीनं वजन घटवलं ते थक्क करणारं आहे. आणि जे लोक वजन कमी होत नाही म्हणून सांगतात, त्यांच्यासाठी एक जबरदस्त उदाहरण त्यांनी ठेवलं आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अनिरुद्ध यांचे वजन 194.5 किलो होते. अनेक लोक त्यांच्या लठ्ठपणाची खिल्ली उडवत असत. शिवाय त्यांना स्वत:लाही या अवाढव्य वजनाचा त्रास सहन करावा लागायचा. त्यांनी नेमकं काय केलं ते जाणून घेऊया.

मला लहानपणापासून खाण्याची आवड होती -

डॉक्टर अनिरुद्ध सांगतात की, त्यांना खाण्यापिण्याची खूप आवड आहे. ते लहानपणापासूनच खूप खात-पिऊन असायचे. त्यामुळे लहानपणीच वजन खूप वाढले होते. ते सांगतांत की, फास्ट फूड खाण्याची खूप आवड होती. पोट भरेपर्यंत ते असे पदार्थ खात राहायचे. अनिरुद्धचे मित्र अनेक वेळा त्याची खाण्यावरून चेष्टा करायचे, पण ते दुर्लक्ष करून खाण्यावर जोर द्यायचे.

इथून बदलाची कहाणी सुरू झाली -

अनिरुद्ध सांगतात की, लठ्ठपणामुळे होणाऱ्या त्रासाकडे किंवा मित्रांच्या चेष्टेकडे त्याने कधीच लक्ष दिले नाही. जेवणाबाबत कधीही तडजोड केली नाही. 2018 मध्ये त्यांनी एमबीबीएस पूर्ण केले, पण खाण्याचा छंद कायम राहिला. ते सांगतात की एमबीबीएस केल्यानंतर काही काळानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. उपचारादरम्यान, डॉक्टरांनी सांगितले की, जर तुम्ही तुमची सवय सुधारली नाही तर पुढील 5 वर्षांत तुम्हाला काही गंभीर आजार होऊ शकतात. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून मी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचे ठरवले.

हे वाचा -खळी पडणाऱ्या मुलींच्याबाबतीत ही गोष्ट असते खास; गाल पाहून पण कळतं बरंच काही

वर्कआउट सुरू करताना 194.5 किलो वजन -

यानंतर ते एका फिटनेस कम्युनिटीमध्ये सामील झाले आणि वर्कआऊट करू लागले. व्यायाम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचे वजन 194.5 किलो होते. ट्रेनरची प्रेरणा, आहार आणि वर्कआउटच्या मदतीने मी 2 वर्षात माझे वजन 110 किलोने कमी केले. आता अनिरुद्धचे वजन जवळपास 94 किलो आहे.

या गोष्टीमुळे वजन कमी होण्यास मदत झाली-

डॉ. अनिरुद्ध यांनी सांगितले की, डाएटिंगऐवजी प्रमाणबद्ध पोषणाने (क्वांटिफाइड न्यूट्रिशन) वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. क्वांटिफाइड न्यूट्रिशन याला म्हणतात, ज्यामध्ये तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर लक्ष ठेवावे. यासोबतच त्या अन्नातील कॅलरीजच्या प्रमाणाकडेही लक्ष देण्याची गरज असते. एवढेच नाही तर प्रथिने, फॅट, कार्ब याकडेही लक्ष द्यावे लागेल. ते म्हणतात की, वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ध्येय. या गोष्टीने मला सर्वात जास्त मदत केली आहे. काहीही करून टार्गेट पूर्ण करूनच थांबेन असं ठरवलं होतं. ही जिद्द मी कधीच मध्ये सोडली नाही. तुम्हाला आहाराचे चांगले ज्ञान असले पाहिजे आणि व्यायामाच्या पद्धतींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

हे वाचा -रात्री मध्येच जाग येत राहते का? या 6 टिप्स फॉलो करा गाढ झोप लागायलाच हवी

हा आहार होता

डॉ.अनिरुद्ध नाश्त्याला पोहे, उपमा किंवा रोटी घेत असे. याशिवाय तो नाश्त्यात सोया चंक्स, सलाड वगैरेही घेत असे. त्याच्या स्नॅक्समध्ये फळे आणि बदामांचा समावेश होता. तर दुपारच्या जेवणात भात किंवा रोटी, डाळी, हरभरा किंवा राजमा असे. याशिवाय दुपारच्या जेवणात भाजी आणि दहीही वापरण्यात आले. संध्याकाळी तो व्हे प्रोटीन घ्यायचा.

First published:

Tags: Weight, Weight loss tips