जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ''मी मराठी माणूस, मुंबई आमच्या बापाची'', संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा

''मी मराठी माणूस, मुंबई आमच्या बापाची'', संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा

''मी मराठी माणूस, मुंबई आमच्या बापाची'', संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना इशारा

शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी पुन्हा एकदा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Sanjay Raut On Kirit Somaiya) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 मे: शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी पुन्हा एकदा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Sanjay Raut On Kirit Somaiya) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. येत्या काळात विक्रांत घोटाळा (INS Vikrant Case) आणि टॉयलेट घोटाळ्यापेक्षाही मोठे घोटाळे उघड होतील, असं म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर आरोप केलेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी टाकण्यात आलेल्या कंपन्यांकडून सोमय्या कुटुंबाच्या खासगी ट्रस्टला कोट्यवधी रुपये देण्यात आले. काळा पैसा पांढरा करण्याचा हा प्रकार आहे का? हे सर्व व्यवहार संशयास्पद असून याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या हे भ्रष्टाचार प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यासोबतच आम्ही लवकरच विधानपरिषदेतील भाजपच्या आणखी दोन आमदारांचा भ्रष्टाचार बाहेर काढू, तुम्ही आमच्याकडे एक बोट दाखवत असताना तुमच्याकडे चार बोटे आहेत. जे स्वतः काचेच्या घरात राहतात, त्यांनी इतरांच्या घरावर दगड भिरकाऊ नयेत, असा इशाराही राऊतांनी सोमय्यांना दिला आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन तापलं राजकारण, मनसेत घडामोडींना वेग   तसंच मी मुंबईचा मराठी माणूस आहे. हे शहर आमच्या बापाचं आहे, तुमच्यासारख्यांचं नाही. तुम्ही मुंबईला लुटत आहात, असा हल्लाबोल ही संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे. मुंबई आमच्या बापाची- संजय राऊत पुढे संजय राऊत म्हणाले की, मी काहीही असेन. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. आम्ही भोंगे असू, पिपाण्या असू, शंख असू, तुतारी असू. तुमच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यावर बोला तुम्ही. मी अजूनही कंपन्यांची नाव घेतलेली नाहीत. ती घेईन. ती नावं पाठवलीत मी. म्हणून आम्ही कोण आहोत ते सोडून द्या. मी मुंबईचा एक मराठी माणूस आहे. मुंबई आमच्या बापाची आहे, परत सांगतो मी. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. मग बाकीचं बघू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात