पुणे, 19 सप्टेंबर : पुण्याची (Pune) वैभवशाली गणपती विसर्जन (Ganpati Visarjan) मिरवणूक यंदाही कोविडच्या परिस्थितीत न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मानाच्या गणपती मंडळांनी समाजहितासाठी उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करायचा निर्णय यंदाही घेतला. मात्र, पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या श्री तुळशीबागच्या विसर्जन (Shri Tulshibaug Ganpati Visarjan) मिरवणुकीत उत्साही कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी ढोल ताशांचा गजर पहायला मिळाला. मिरवणूक, ढोल ताशा वादन याला परवानगी नव्हती मात्र, असे असतानाही मिरवणूक वाजत गाजत निघत होती. यावेळी घटनास्थळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सुद्धा दाखल झाले आणि त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी पोलीस आयुक्तांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. सत्कार झाल्यावर पोलीस आयुक्त घटनास्थळावरुन निघून गेले.
पुण्यातील तुळशीबाग विसर्जन मिरवणूक pic.twitter.com/V8WmPBO8xB
— News18Lokmat (@News18lokmat) September 19, 2021
पोलीस आयुक्त हे ढोल ताशे सुरू असतानाही काही बोलले नाहीत यामुळे कार्यकर्त्यांत गैरसमज झाला आणि त्यांनी आपलं वाद्य सुरूच ठेवलं. पोलीस आयुक्त घटनास्थळावरुन निघून गेल्यावर विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथक आणखी वाढले. कार्यकर्त्यांनीही ढोल ताशांच्या गजरात नाचण्यास सुरुवात केली. यानंतर घटनास्थळी पोलीस आले आणि त्यांनी वाजत-गाजत मिरवणूकीला विरोध केला.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतलं तुळशीबाग गणपतीचं दर्शन pic.twitter.com/CWhMe6Vhz5
— News18Lokmat (@News18lokmat) September 19, 2021
Ganeshotsav 2021: गणेश विसर्जनासाठी मुंबईत निर्बंध लागू, लहान मुलांना मिरवणूक आणि विसर्जनस्थळी आणायला बंदी यावेळी उत्साही कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि मग पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पहायला मिळालं. अखेर पोलिसांनी ढोल ताशा पथकांना रोखले आणि त्यांचे साहित्य जप्त केले. तसेच त्यांची नावे, ढोल ताशा पथकांची माहिती घेतली. या संपूर्ण प्रकरणावर तुळशीबाग मंडळाचे विश्वस्त नितीन पंडित यांनी म्हटलं, मिरवणूक, ढोल ताशा वादन याला परवानगी नव्हती. कार्यकर्ते उत्साह वाढला संयम सुटला. पोलिसांचं कामच आहे हे, आम्ही पोलिसांना विनंती केली आणि त्यांनी कोणतीही कारवाई पोलीस करणार नाहीत असं म्हटले. मुंबईची शान ‘लालबागचा राजा’ चं राजेशाही पद्धतीनं विसर्जन, ट्रकवर फक्त 10 पदाधिकारी 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात गणेश विसर्जनाठी पुणे मनपाने शहरात ठिकठिकाणी फिरते हौद उपलब्ध करून दिलेत त्याच हौदाच्या ठिकाणी मूर्तिदानही स्वीकारलं जाणार आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सलग दुसऱ्यावर्षी नदीघाटावरील विसर्जनाला बंदी आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनीही उत्सव मंडपाच्या आवारातच कृञिम बांधून लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप द्यायचा आहे. गणेश विसर्जनादिवशी 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहेत. मंडळांनी मंडपातच हौद तयार करून विसर्जन करायचे आहे. नदी पात्रात विसर्जनाला बंदी आहे. तसंच आज पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने मिरवणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जन अगदी साधेपणाने तसेच मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थित करण्याचे आवाहन पोलीस आणि सरकारकडून करण्यात आलं होतं. तसेच ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यासही मनाई करण्यात आली होती. मात्र, असे असतानाही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.