जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईची शान 'लालबागचा राजा' चं राजेशाही पद्धतीनं विसर्जन, ट्रकवर फक्त 10 पदाधिकारी

मुंबईची शान 'लालबागचा राजा' चं राजेशाही पद्धतीनं विसर्जन, ट्रकवर फक्त 10 पदाधिकारी

मुंबईची शान 'लालबागचा राजा' चं राजेशाही पद्धतीनं विसर्जन,  ट्रकवर फक्त 10 पदाधिकारी

अनंत चथुर्तीच्या दिवशी म्हणजेच आज लालबागच्या राजाचं ( Lalbaugcha raja 2021) विसर्जन गिरगाव चौपाटीवर होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 सप्टेंबर: कोरोनामुळे (Corona Virus) गणरायाला आज साधेपणाने निरोप दिला जाणार आहे. अनंत चथुर्तीच्या दिवशी म्हणजेच आज लालबागच्या राजाचं ( Lalbaugcha raja 2021)  विसर्जन गिरगाव चौपाटीवर होणार आहे. आज सकाळी 10 वाजता लालबागच्या राजाची उत्तर आरती होईल. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रकवर लालबागच्या राजाची मूर्ती ठेवण्यात येईल. त्यानंतर लालबाग मार्केटमधून लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक साधेपणाने निघणार आहे. यावेळी ट्रकवर मंडळाचे फक्तं 10 पदाधिकारी असणार आहेत. त्यांच्याशिवाय इतर कोणाही कार्यकर्त्यांना ट्रकवर किंवा ट्रक सोबत मिरवणुकीत सहभाग होता येणार नाही आहे. कोविड 19 संसर्ग मार्गदर्शक सूचनांचं पालन करतच लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि साधेपणाने निघणार आहे. यावेळी लालबागच्या राजाचा विसर्जन मार्ग दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या मार्गानेच निघणार आहे. संध्याकाळी लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर आगमन होईल आणि अरबी समुद्रातील विशेष तराफ्यावरून लालबागच्या राजाचं विसर्जन राजेशाही पद्धतीनं करण्यात येणार आहे.

30 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येकाला मिळतील 5 लाख रुपये! तुमचं या बँकेत अकाऊंट आहे का?

मार्गदर्शक सूचनांचे पालन करतच गणेशमूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्थीला लालबागमधील मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन सोहळ्या संदर्भात मुंबई पोलीस आणि गणेशोत्सव मंडळ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार असल्याचं निश्चित करण्यात आलंय. लालबागमधील गणेश विसर्जन सोहळ्यात सर्वाचं लक्ष असतं ते लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन सोहळ्याकडे. पण यंदा कोविड 19 संसर्गामुळे गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने कडक शिस्त दाखवत आदर्श निर्माण केला आहे.

पृथ्वीवरची अशी जागा जिकडे पायलट विमान न्यायला घाबरतात, खूपच भीतीदायक असतो अनुभव

 गणेशगल्ली सकाळी 9 वाजता उत्तर आरती सकाळी 10 वाजता गणेशमूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे निघणार.

लालबागचा राजा सकाळी 10.30 वाजता उत्तर आरती सकाळी 12 वाजता लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे निघणार. दरवर्षीच्या विसर्जन मार्गावरूनच गणेशमूर्ती निघणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात