मुंबई, 19 सप्टेंबर: महाराष्ट्राचा (Maharashtra) महाउत्सव म्हणजेच गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2021) आज सांगता होत आहे. कोविड 19 (Corona Virus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच गणेशभक्तांनी साजरा केला. दरवर्षी अनंत चतुर्थीला मुंबईकरांचं (Mumbai) स्पिरीट, ऊर्जा, जल्लोष आणि उत्साह मुंबईच्या रस्त्यांवर आणि गणेश विसर्जन स्थळांवर पहायला मिळतो. लागोपाठ दुसऱ्या वर्षीही गणेशभक्तांना आपल्या जल्लोषाला कोविड 19 संसर्गामुळे मर्यादीत ठेवावा लागतोय. पण उत्साह कुठेही कमी दिसणार नाही आहे.
राज्य सरकार, मुंबई महापालिका (BMC)आणि मुंबई पोलीस (Mumbai Police) यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. यातही सर्वाचं लक्ष असणार आहे ते मुंबईची शान असणाऱ्या लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन सोहळ्याकडे. दरवर्षी लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पहाण्यासाठी लालबाग ते गिरगाव चौपाटी पर्यंत गणेशभक्त रस्त्यांच्या दुतर्फा दिवसभर उभे असतात. यंदा कोविड 19 संसर्गामुळे गणेशभक्तांना लालबागच्या राजाचे प्रत्यक्ष दर्शन न घेता ऑनलाईन दर्शन घेतलं आहे. त्यामुळे विसर्जन सोहळ्यात लालबागचा राज्याचं प्रत्यक्ष दर्शन करण्याची तीव्र इच्छा गणेशभक्तांमध्ये आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जन मार्गावर गणेशभक्तांच्या गर्दीला आवर घालणं मुंबई पोलिसांनाही कठीण जाणार आहे.
हेही वाचा- विद्यार्थीनीचे केस कापणं शिक्षिकेला पडलं भलतंच महागात; पालकांनी मागितली 7 कोटी रुपयांची भरपाई
खरं तर मुंबई पोलिसांसाठी आजचा दिवसात मोठी परिक्षाच असणार आहे. विसर्जन सोहळ्यात गणेशभक्तांची गर्दी उसळू नये यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोउत्सव मंडळाने लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा गिरगाव चौपाटीपर्यंत लाईव्ह ऑनलाईन पहाता येईल अशी व्यवस्थाही केली आहे.
प्रेयसी आणि तिच्या 3 मुलांची हत्या करुन पसार, मुंबईत येताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मुंबई महापालिका यंदाच्या गणेश विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव असल्यानं मुंबईत निर्बंध लागू केलेत. णेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गिरगाव चौपाटीवर आज मुंबईतल्या अनेक गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. चौपाटी परिसरात गर्दी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जातं आहे.
गणेशगल्ली
सकाळी 9 वाजता उत्तर आरती
सकाळी 10 वाजता गणेशमूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे निघणार.
लालबागचा राजा
सकाळी 10.30 वाजता उत्तर आरती
सकाळी 12 वाजता लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीकडे निघणार.
दरवर्षीच्या विसर्जन मार्गावरूनच गणेशमूर्ती निघणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Mumbai police