मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई हादरली! घरगुती उपचाराच्या नावाखाली घृणास्पद कृत्य; 2 महिने अल्पवयीन मुलीला दिल्या नरक यातना

मुंबई हादरली! घरगुती उपचाराच्या नावाखाली घृणास्पद कृत्य; 2 महिने अल्पवयीन मुलीला दिल्या नरक यातना

आरोपी नराधमानं घरगुती उपचार करण्याच्या नावाखाली पीडित अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.

आरोपी नराधमानं घरगुती उपचार करण्याच्या नावाखाली पीडित अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.

Rape in Mumbai: नालासोपारा परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या (Rape on minor girl) परिसीमा गाठणारी संतापजनक घटना समोर आली आहे.

    विरार, 27 ऑगस्ट: नालासोपारा (Nalasopara) परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या (Rape on Minor Girl) परिसीमा गाठणारी संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी नराधमानं घरगुती उपचार करण्याच्या नावाखाली पीडित अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. आरोपीनं सलग दोन महिने पीडितेवर अत्याचार (Minor girl raped for 2 months) केला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यातील रहिवासी असणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीला मागील काही दिवसांपासून पाठदुखीचा त्रास होता. अनेक ठिकाणी उपचार करूनही अपेक्षित फरक पडत नव्हता. तिच्या पाठिच्या वेदना वाढतच जात होत्या. दरम्यान घराशेजारी राहणारी एक व्यक्ती पायाळू असून पाठ झाडून दुखणं बरं करते, अशी माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यामुळे कुटुंबानं पीडितेला नराधमाकडे उपचारासाठी नेलं. हेही वाचा-पुणे हादरलं! नशेचं इंजेक्शन देत रॅपरकडून अल्पवयीन मॉडेलवर बलात्कार याठिकाणी आरोपीनं घरगुती उपचार करण्याच्या नावाखाली पीडितेसोबत अत्याचाराचा कळस गाठला आहे. आरोपीनं सलग दोन महिने पीडित मुलीला घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केला आहे. यातूनच पीडित मुलगी गर्भपती राहिल्यानंतर ही बाब कुटुंबीयांना कळाली आहे. हा विचित्र प्रकार समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी त्वरित पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. हेही वाचा-...अन् मोठा अनर्थ टळला; नागपूरात भूकेनं व्याकूळ तरुणीवर नराधमाकडून बळजबरी पीडितेच्या तक्रारीनुसार, तुळिंज पोलिसांनी नराधम आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित आरोपीनं अशाप्रकारे आणखी कोणावर अत्याचार केला आहे का? याचा तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai, Rape on minor, Virar

    पुढील बातम्या