Home /News /news /

आधी दुचाकीला बांधून 400 मीटर फरफटलं मग झाडाला बांधून...; जालन्यात तरुणाची फिल्मी स्टाइल हत्या

आधी दुचाकीला बांधून 400 मीटर फरफटलं मग झाडाला बांधून...; जालन्यात तरुणाची फिल्मी स्टाइल हत्या

Murder in Jalna: जालन्यातील एका तरुणाला फिल्मी स्टाइल वेदना देत त्याची निर्घृण हत्या (Murder in Jalna) केल्याची घटना समोर आली आहे.

    जालना, 05 जुलै: बदनापूर तालुक्यातील डोंगरगाव सायगाव येथील रहिवासी असणाऱ्या युवकाची फिल्मी स्टाइल वेदना देत हत्या (Murder in Jalna) केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवक मागील पाच दिवसांपासून बेपत्ता होता. शनिवारी कुंभारी शिवारातील भागवत बाबासाहेब बिडे यांच्या शेतातील एका पडक्या विहिरीत त्यांचा मृतदेह (Dead body) आढळला आहे. ही घटना उघकीस येताच, परिसरात तणाव निर्माण झाला होता. तब्बल दोन तास पोलिसांनी समजूत काढल्यानंतर प्रकरणं काहीसं निवळलं आहे. याप्रकरणी पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. शनिवारी भोकरदन तालुक्यातील कुंभारी शिवारातील एका पडक्या विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पण मृतांच्या नातेवाईकांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहे. संबंधित मृत तरुणाला चार अज्ञात युवकांनी विद्युत पंप चोरीच्या संशयातून मारहाण करत त्याची हत्या (Beat and murder) केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आरोपींनी मृत तरुणाला आधी दुचाकीला बांधून चारशे मीटरपर्यंत फरफटत (first they tied to bike and pull 400 meters) नेलं. त्यानंतर त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. ज्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणाचा मृतदेह एका पडक्या विहिरीत फेकून दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हेही वाचा-फोनवर बोलल्याची तालिबानी शिक्षा! महिलेला अमानुष मारहाण, अंगावर काटा आणणारा VIDEO शिवाजी बाबासाहेब पितळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. जोपर्यंत आरोपींविरोधात कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका गावातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी घेतली होती. पण पोलिसांनी तब्बल दोन तास समजूत काढल्यानंतर आणि कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. हेही वाचा-VIDEO : क्षुल्लक कारणावरुन आर्मीचा जवान भडकला; रागाच्या भरात एकाचा जीवच घेतला 29 जून रोजी खून झाल्याचा आरोप 29 जून रोजी चार अज्ञात तरुणांनी मृत तरुण शिवाजी पितळे याचं अपहरण केलं होतं. यानंतर त्यांनी तरुणाला विद्युत पंप चोरीच्या संशयातून झाडाला बांधून बेदम मारहाण केली आहे. तसेच त्याला दुचाकी बांधून जवळपास 400 मीटर फरफटत नेल्याचा आरोपही कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder

    पुढील बातम्या