पिंपरी चिंचवड, 27 सप्टेंबर : राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नदी नाले, तळावर तुडुंब भरलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये (pimpari chinchvad) तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार जण बुडाल्याची (drowned ) घटना घडली आहे. या घटनेत दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. तर एका 13 वर्षांच्या मुलाने देवासारखं धाव घेऊन दोघांना वाचवले आहे.
पिंपरी चिंचवडमधील सद्गुरूनगर, भोसरी इथं आज दुपारी ही घटना घडली. सूरज अजय वर्मा (वय 12, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) आणि ओमकार प्रकाश शेवाळे (वय 13) असं मृत्यू झालेल्या मुलांची नाव आहे. तर संदीप भावना डवरी (वय 12), ऋतुराज प्रकाश शेवाळे (वय 14) या मुलाचे प्राण वाचविण्यात यश आले. मात्र, या दोघांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. म्हैस चारण्यासाठी गेलेल्या आयुष गणेश तापकीर या 13 वर्षांच्या मुलाने बुडत असलेल्या दोघांना वाचविले.
तरुणाच्या पार्श्वभागात झाला ब्लास्ट आणि निघाला धूर; नेमकं काय घडलं पाहा VIDEO
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्गुरूनगर भोसरी येथील जुन्या कचरा डेपोजवळ असलेल्या तलावामध्ये 12 ते 15 वयोगटातील चार मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने ती मुले बुडू लागली.
ही बाब म्हैस चारण्यासाठी आलेल्या आयुषच्या लक्षात आली. त्यानंतर त्याने तलावाच्या दिशेने धाव घेतली आणि लगेच उडी टाकली. संदीप, ओमकार आणि ऋतूराज या तिघांना आयुष तापकीर याने पाण्याबाहेर काढले. मात्र सूरज याचा पत्ता लागला नाही.
ED च्या जाळ्यातून तुर्तास वाचले अडसूळ, तब्बल 14 तास होते अधिकारी हॉस्पिटलमध्ये
घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. जखमीपैकी दोघांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं . त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अग्निशामक दलास पाचारण करून सूरज याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे. दोन मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पण, ऐनवेळी आयुषने धाव घेऊन दोघांना वाचवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.