• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • ED च्या जाळ्यातून तुर्तास वाचले सेनेचे नेते आनंदराव अडसूळ, तब्बल 14 तास होते अधिकारी सोबत!

ED च्या जाळ्यातून तुर्तास वाचले सेनेचे नेते आनंदराव अडसूळ, तब्बल 14 तास होते अधिकारी सोबत!

 आज सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व अधिकारी हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून होते. पण,

आज सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व अधिकारी हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून होते. पण,

आज सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व अधिकारी हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून होते. पण,

 • Share this:
  मुंबई, 27 सप्टेंबर :  अमरावतीच्या सिटी बँकेत अनियमितता (andandrao adsul city bank scam) झाल्याच्या आरोपावरून ईडीने (ed) आज शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्या घरी धाड टाकली होती. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची दाट शक्यता होती. मात्र, अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. तरीही ईडीचे अधिकारी तब्बल 14 तास रुग्णालयात तळ ठोकून होते. अखेर अधिकारी तिथून निघून गेले. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर आरोपांची मालिका सुरूच आहे. आज या अंकात अमरावतीचे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा नंबर लागला. सिटी बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या घरी आज ED च्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली. यावेळी आनंदराव अडसूळ यांना ED चे अधिकारी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेणार अशीही चर्चा सुरू झाली होती. असं असतं राजकारण! शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे तिन्ही नेते आले एकत्र मात्र आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना गोरेगावमधील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये (Life Line Hospital in Goregaon) उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर वाटल्यावर पुन्हा ईडीचे अधिकारी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेणार अशी रणनीती आखली होती. यासाठी  लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ED चे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. आज सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व अधिकारी हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून होते. पण, अडसूळ यांच्या प्रकृतीत कोणताही सुधारणा झाली नाही. त्यामुळे 14 तासांच्या प्रतिक्षेनंतर ईडीचे अधिकारी हॉस्पिटलमधून निघून गेले. ईडीचे एक वरिष्ठ अधिकारी हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांनी  डॉक्टरांशी चर्चा केली. त्यावेळी डॉक्टरांनी अडसूळ यांना पुढचे 48 तास निरीक्षणाखाली ठेवावं लागेल, असं सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तिथून जाण्याचा निर्णय घेतला. भाच्याचा मामीवर बलात्कार, फरार आरोपी आला परीक्षा द्यायला; अडकला जाळ्यात दरम्यान, उपमहापौर सुहास वाडकर यांनी आनंदराव अडसुळ यांच्या भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. पण, 'मी त्यांची भेट घेतली नाही, माझ्या कार्यकर्त्याचा अपघात झाला म्हणून येथे आलो होतो. मला काही माहीत नाही मी भेट घेतली नाही' असं सांगून ते निघून गेले. तर दिंडोशीचे माजी नगरसेवक सदाशिव पाटील यांनी अडसूळ यांची भेट घेतली.  अडसूळ यांची तब्येत ठीक नाही, बाकी मी काही बोलू शकत नाही' असं त्यांनी सांगितलं. अडसूळ यांच्यावरील आरोप सिटी बँकेत 900 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भाजप आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. 5 जानेवारी रोजी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप केला. अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्र सादर करण्यासाठी राणा ईडीच्या कार्यालयातही गेले होते. मुंबईमध्ये सिटी को-ऑप बँकेच्या 13 ते 14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार असून ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटण्यात आलेलं कर्ज कारणीभूत असल्याचा आरोप रवी राणा यांच्याकडून करण्यात आला होता. अडसूळ यांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. खातेदारांना फक्त एक हजार एवढी रक्कम मिळत असल्याचंही रवी राणा यांनी आपल्या आरोपात म्हटलं होतं.
  Published by:sachin Salve
  First published: