फिलाडेल्फिया, 07 ऑक्टोबर: अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये एटीएम मशीन फोडण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न फारच चमत्कारिकरित्या फसला. पैसे चोरताना स्फोट झाला, एटीएम मशीनचं नुकसानही झालं पण दरोडेखोरांना पैसे पळवून नेता आले नाहीत, अशी माहिती याबाबत पोलिसांनी दिली. नेमके काय घडले? वायव्य फिलाडेल्फियामधील गोल्डन चायनीज-अमेरिकी रेस्टॉरंटमध्ये एक एटीएम मशीन होतं. शुक्रवारी रात्री 9 नंतर तीन चोर या रेस्टॉरंटमध्ये गेले होते आणि त्यांनी काही पदार्थ ऑर्डर केले. त्यानंतर त्यांनी एटीएममध्ये स्फोटकं ठेवली आणि ते निघून गेले. काही वेळानी त्याठिकाणी स्फोट झाला आणि एटीएमच्या खिडक्या तुटल्या. यावेळी शेजारी असणाऱ्या रेस्टॉरंटमधील पदार्थ शेल्फवरून खाली पडले, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली. (हे वाचा- मोठी बातमी! भारतीय कंपनीने जिंकली PepsiCo विरोधातील केस, 15 वर्ष सुरू होता खटला) काही वेळानी ते तिघं पुन्हा त्या रेस्टॉरंटमध्ये आले. पण त्यांना एटीएमच्या आतमध्ये बसवलेला कॅशबॉक्स काढता आला नाही. तो कॅशबॉक्स अजूनही तिथंच आहे. कॅशबॉक्स हाती लागत नाही हे पाहून शेवटी एक जण सायकलवर आणि इतर दोघं तिथून पळून गेले. त्यांना रिकाम्या हातांनेच पळ काढावा लागला. हा दरोड्याचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेरांत कैद झाला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे. पण अद्याप कुणाला अटक झालेली नाही. या दरोड्याची क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. दिल्लीतही घडला होता असाच प्रकार नवी दिल्लीतील एका एटीएममध्ये एक माकड घुसलं होतं. त्याने एटीएम मशीनवर जोरजोरात प्रहार केले होते. त्या मशीनचे तुकडे झाल्याचं पोलिसांना लक्षात आलं होतं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर लक्षात आलं की माकडाने एटीएम सेंटरमध्ये धुमाकूळ घातला होता आणि शेवटी त्यानी सीसीटीव्ही कॅमेराही फोडला होता. माकड एटीएममध्ये आलं आणि त्याने सगळीकडे पाहिलं आणि नंतर ते एटीएमच्या मशीनवर चढून बसलं. त्यानी मशीनचा डिस्प्ले फोडला आणि नंतर ते निरखत बसलं. त्यावेळीही मशीनचे तुकडे झाले पण पैसे सुरक्षित होते. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.