मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणे हादरलं, नवले पुलाजवळ विचित्र अपघाताचा पहिला VIDEO

पुणे हादरलं, नवले पुलाजवळ विचित्र अपघाताचा पहिला VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला आहे.

पुणे, 06 ऑक्टोबर : पुणे शहरातील नवले पूलाजवळ विचित्र अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकने 10 ते 15 वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातात एका जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण  जखमी झाले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील नवले पुलाजवळ आज सकाळी हा अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात ट्रकने 10 ते 15 गाड्यांना धडक दिली आहे. भरधाव ट्रकने समोर आलेल्या  जीप आणि दोन गाड्यांना जोराची धडक दिली आहे. या धडकेमुळे काही वाहनं ही रस्त्याच्या बाजूला फेकली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रकचे अचानक टायर फुटले होते, त्यामुळे ट्रकचालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला. या भरधाव ट्रकने दुचाकी आणि तीन ते चार, चार चाकी गाड्यांना धडक दिली. या अपघातात एका जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर आणखी चार जणांना नवले रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. हा ट्रक कात्रजकडून देहूरोडच्या दिशेने चाललेला होता.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. जखमी व्यक्तींनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातामुळे नवले पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली होती.  पोलिसांनी तात्काळ क्रेन लावून ही वाहणं बाजूला हटवल्याने तिथली वाहतूक आता सुरळीत झाली आहे.

पिकअप व्हॅनला ट्रकची धडक, 6 मजुरांचा मृत्यू

दरम्यान, मध्य प्रदेशमधील धार जवळ झालेल्या एका भीषण अपघातात 6 शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी 20 मजूर जखमी झाले आहे. यातील 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

IPL मध्ये सट्टा लावणाऱ्या 5 बुकींना अटक; लॅपटॉप, मोबाईल क्राइम ब्रॅंचकडून जप्त

धार जवळील इंदुर-अहमदाबाद महामार्गावर ही घटना घडली आहे. सोयाबीनची कापणी करून हे शेतमजूर पिकअप व्हॅनने केसूर इथून टांडा इथं जात होते. वाटेत पिकअप व्हॅन पंक्चर झाली. त्यामुळे रस्त्याच्या कडेला व्हॅनचे टायर बदली करण्यात येत होते. यावेळी काही शेतमजूर ड्रायव्हरला मदत करण्यासाठी खाली उतरले होते. तर काही जण हे गाडीतच बसलेल होते. त्याचवेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या टँकरने पिकअप व्हॅनला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रस्ताच्या बाजूला उभे असलेल्या शेतमजुरांसह ट्रॅकने व्हॅनला जोरात धडक दिली. यात चार शेतमजूर हे चाकाखाली सापडले आणि त्यांचा जागेवर मृत्यू झाला. तर गाडी बसलेल्या दोन मंजुरांचाही जागीच मृत्यू झाला. या 20 अपघातात मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

First published: