पुणे, 22 मे: कोरोनाच्या घट्ट विळख्यात सापडल्या पुण्यातून एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली आहे. ससून हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून एक गंभीर रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. प्लाझ्मा थेरपीने एखाद्या कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
हेही वाचा...धक्कादायक! कोरोनाचा धोका वाढला, स्वॅब घेतल्यानंतर अवघ्या तासभरात रुग्णांचा मृत्यू
वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, ससून हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा देण्याची प्रक्रिया मागील आठवड्यात यशस्वीरित्या पार पडली. पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये 6 मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण बरा झाला होता. नंतर या रुग्णाच्या शरीरातील प्लाझ्मा (रक्तातील 1 घटक) ससून हॉस्पिटलमध्ये दान देण्यात आला होता. आता त्याच प्लाझ्माच्या मदतीने गंभीर रुग्णाचा प्राण वाचवण्यात वैद्यकीय पथकाला यश आलं आहे.
रुग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्या कोव्हिड वार्डमधून दुसऱ्या वार्डात हलवण्यात येणार आहे. दरम्यान, रुग्ण बरा झाल्यानंतर किमान 1 महिन्यांत त्याच्या रक्तामध्ये कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला उच्च रक्तदाब, हायपोथाराईडीझमचा आजार आहे. आता लवकरच या रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
हेही वाचा..मोठी बातमी! प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदी सरकारनं घेतली मागेप्लाझ्मा दान करण्याचं आवाहन...
कोव्हिड 19 आजारातून बरा झालेला रुग्ण, 28 दिवसांपेक्षा जास्त लक्षणे नसलेला प्लाझ्माचे दान करू शकतो. 18 वर्षांपेक्षा जास्त असलेला पुरुष किंवा मुलबाळ नसलेली महिला प्लाझ्माचे दान करून रुग्णाला जीवदान देण्यास मदत करू शकतात,असं आवाहन ससूनच्या अधिष्ठातांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.