Home /News /news /

मोठी बातमी! प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदी सरकारनं घेतली मागे

मोठी बातमी! प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदी सरकारनं घेतली मागे

केंद्रीय पर्यावरण विभागाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर घातलेली बंदी मागे घेतली आहे.

मुंबई, 22 मे: केंद्रीय पर्यावरण विभागाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर घातलेली बंदी मागे घेतली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरची बंदी केंद्र सरकारने एक वर्षांने पुढे ढकलली असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हेही वाचा.. कोरोनाचं निमित्त पण राजकीय खुन्नस जुनीच! सत्ताधारी ठाकरे सरकार आणि भाजप आमनेसामने देशात आधीच तयार झालेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचं मोठं नुकसान होणार नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यावरण विभागाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वर बंदी घातल्याचा निर्णय जाहीर केला होता. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असणारे प्लास्टर ऑफ पॅरिस वापरात आणू नये, असे निर्देश कोर्टाने दिल्यानंतर केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने याबाबतचे नोटिफिकेशन जाहीर केले होते. हेही वाचा.. धक्कादायक! कोरोनाचा धोका वाढला, स्वॅब घेतल्यानंतर अवघ्या तासभरात रुग्णांचा मृत्यू आशिष शेलारांनी प्रकाश जावडेकरांना लिहिलं होतं पत्र केंद्रीय पर्यावरण विभागाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वर बंदी घातल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलं होतं. आशिष शेलार यांनी यांनी मुर्तीकारांच्या अडचणीही पत्राद्वारे त्यांना कळवल्या होत्या. केवळ या वर्षासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर घातलेली बंदी शिथिल करावी, अशी मागणी केली होती. 'प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींऐवजी शाडू मातीच्या गणेश मूर्तीचा आग्रह धरणे निसर्गाच्या दृष्टीने कधीही योग्य आहे. मात्र यावेळी आलेले करोनाचे संकट, त्यामुळे मुर्तीकारांना मिळालेला अपुरा वेळ व अडचणीत आलेली अर्थव्यवस्था या सगळ्याचा विचार करता केवळ या वर्षासाठी पीओपीच्या मूर्तींवर घातलेली बंदी शिथिल करावी,' असं आशिष शेलार यांनी प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. प्रकाश जावडेकरांचे आभार! दरम्यान, सर्व मूर्तीकार कलाकारांचा विचार करून प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी एक वर्षांसाठी स्थगित करण्यात आली आहे. याबद्दल बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. याबाबत दिलेल्या निवेदनानुसार प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या सहकार्य केल्याचं बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं म्हटलं आहे. या पत्रव्यहारात सहकार्य करणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग-महाराष्ट्र राज्य यांचे देखील आभार मानले आहेत. सर्व मूर्तीकारांना याद्वारे आश्वस्त करून ईच्छितो की मूर्तीकारांचे कुठलेही नुकसान होऊ नये यासाठी समिती कटिबद्ध आहे. यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करायचा असून त्यानुसार मंडळे, कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे व गणेशोत्सवा दरम्यान भाविक, तसेच आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असंही समितीनं म्हटलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Pop

पुढील बातम्या