बीड, 22 मे: बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना टेस्टसाठी स्वॅब घेतलेल्या व्यक्तीचा आयसोलेशन वार्डमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वॅब घेतल्यानंतर अवघ्या तासभरात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडाही झपाट्यानं वाढत आहे.
हेही वाचा.. आधी 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?', आता काढायचे 'महाराष्ट्र बचाव'चे गळे
जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात एकाला दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी स्वॅब घेतल्यानंतर अवघ्या एक तासाच या व्यक्तीचा मृत्यू झाला. आता अहवालाची प्रतीक्षा आहे. मृत रुग्ण आष्टी तालुक्यातील रहिवासी आहे. तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याने विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. मात्र, श्वसनाचा त्रास वाढल्यानंतर त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री त्याचा कोरोना टेस्टसाठी स्वॅब घेतला. त्यानंतर तासभरात या रुग्णाचा मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकून 36 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एका वृद्ध महिलेचा मृत्यू तर सहा रुग्णांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 41 हजार, 642 वर
राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. गुरुवारी दिवसभरात 2 हजार 345 नवीन रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 41 हजार 642 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 64 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 1 हजार 454 कोरोनाबळी ठरले तसेच राज्यात 1 हजार 408 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत 11 हजार 726 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात सध्या 28 हजार 454 रुग्णांवर उपाचार सुरु आहे. तर मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 25 हजार 500 वर पोहोचली आहे. एकूण मृतांचा आकडा आता 882 झाला आहे
हेही वाचा...जमावबंदी कायद्याची ऐसी तैसी! परळीत भाजप आमदारासह 22 जणांवर गुन्हा दाखल24 तासांत 6088 नव्या रुग्णांची नोंद...
दुसरीकडे, देशात कोरोनाने रेकॉर्ड मोडला आहे. गेल्या 24 तासांत म्हणजेच गुरुवारी सकाळी 8 ते शुक्रवार सकाळी 7 दरम्यान देशभरात कोरोना व्हायरसच्या सुमारे 6100 घटना समोर आल्या आहेत.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशभरात एकूण 1,18,447 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 66,330 सक्रिय प्रकरणं, 48,533 डिस्चार्ज, 3,583 मृत्यू आणि एक रुग्ण बरा होण्यापूर्वीच परदेशात गेला असल्याचं सांगण्यात येत आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 6,088 नवीन प्रकरणे नोंदली गेली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.