गेल्यावर्षी या आठवड्यापर्यंत सर्वकाही होतं आलबेल, पण 9 मार्च 2020 रोजी बदललं पुणेकरांसह राज्याचं जीवन

गेल्यावर्षी या आठवड्यापर्यंत सर्वकाही होतं आलबेल, पण 9 मार्च 2020 रोजी बदललं पुणेकरांसह राज्याचं जीवन

First Corona Patient was found in Pune: साधारण एका वर्षाने पुण्यामधील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. पुण्यामध्ये अजूनही 1 हजार 412 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहे.

  • Share this:

पुणे, 09 मार्च: आज साधारण वर्षाहून जास्त कालावधी लोटला आहे की जग कोरोनाशी (COVID-19 Pandemic) दोन हात करून लढा देत आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनामुळे (Corona) फटका बसला आहे. महाराष्ट्रातही (Coronavirus in Maharashtra) कोरोनाचा शिरकाव होऊन आज वर्ष पूर्ण होत आहे. गेल्यावर्षी या आठवड्यामध्ये कुणाला कानोकान खबर नव्हती की कोरोना एवढं रौद्ररुप धारण करेल. 09 मार्च 2020 रोजी पुण्यात (First Corona Patient in Pune) कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. दुबईहून पुण्यात आलेल्या व्यक्तीला पहिला कोरोना संसर्ग (Corona Positive) झाला होता. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती आणखी चिघळत गेली होती. संपूर्ण जगासाठी या वर्षभराच्या कालावधीमध्ये लॉकडाऊन, कर्फ्यू, अनलॉक, सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाइन हे शब्द अगदी नेहमीच्या वापराचे झाले आहेत.

(हे वाचा-दोन दिवस पुरतील एवढेच कोरोना लशीचे डोस शिल्लक, मनपाला प्रतीक्षा पुढील साठ्याची)

साधारण एका वर्षाने पुण्यामधील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. पुण्यामध्ये अजूनही 1 हजार 412 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात तब्बल 9 हजार 316 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. जिल्ह्यात 4 लाख 20 हजार 877 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 3 लाख 97 हजार 588 जण कोरोना मुक्त झालेत, ही बाब मात्र दिलासादायक आहे.

(हे वाचा-मुंबईत कोरोना धोका वाढला या उच्चभ्रू भागामुळे; हॉटेल्स, पब्जमुळे वाढला आकडा)

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रूग्ण पुण्यात आढळला आणि सर्वत्र खळबळ उडाली होती. पुण्यातील नायडू रूग्णालयात या रुग्णांवर  उपचार करण्यात आले होते.  एकूण 40 जण दुबईला गेले होते, 1 मार्च 2020 रोजी ते सर्व पुण्यात परतले होते. यापैकी दोन जण पॉझिटिव्ह सापडले होते. त्यानंतर पुणे शहर आणि इतर परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. कालांतराने कोरोनाचा शिरकाव ठाणे आणि मुंबई शहरात झाला.

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 9, 2021, 9:52 AM IST
Tags:

ताज्या बातम्या