दोन दिवस पुरतील एवढेच कोरोना लशीचे डोस शिल्लक, मनपाला प्रतीक्षा पुढील साठ्याची

दोन दिवस पुरतील एवढेच कोरोना लशीचे डोस शिल्लक, मनपाला प्रतीक्षा पुढील साठ्याची

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा (Corona Vaccination Drive 2.0) सुरू झाल्यानंतर राज्यभरातील विविध लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली आहे. दरम्यान नागपूर महानगरपालिकेसमोर एक नवं संकट उभं राहण्याची शक्यता आहे.

  • Share this:

तुषार कोहळे, नागपूर, 09 मार्च: राज्यभरात पुन्हा एकदा कोरोना (Coronavirus in Maharashtra) फोफावू लागल्यानंतर सामान्यांची चिंता वाढली होती. दरम्यान कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा (Corona Vaccination Drive 2.0) सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला होता. मात्र सध्या नागपूर महानगर पालिकेसमोर (Nagpur Municipal Corporation) एक वेगळंच संकट उभ राहण्याची शक्यता आहे.

नागपूर महानगर पालिकेकडे केवळ दोन दिवस पुरेल इतकाच कोव्हिड लशीचा (COVID-19 Vaccine) साठा शिल्लक आहे. पालिकेकडे सध्या 19 हजार डोस उपलब्ध असून नागपूर मध्ये 18 शासकीय आणि 37 खाजगी केंद्रावर रोज 10 हजार डोस लागतात. तिसऱ्या टप्प्यात लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नागपूरमध्ये लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर  संबंधित वयोगटातील व्यक्तींनी लस घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आता मर्यादित साठा शिल्लक असल्यामुळे पालिका काय निर्णय घेईल ते पाहणे महत्वाचे ठरेल. दरम्यान नागपूर महानगरपालिका आता पुढील साठा कधी पाठवला जाईल याची वाट पाहत आहे. राज्य सरकारकडे पालिकेने अडीच लाख डोसची मागणी केली आहे.

(हे वाचा-मुंबईत कोरोना धोका वाढला या उच्चभ्रू भागामुळे; हॉटेल्स, पब्जमुळे वाढला आकडा)

नागपूरच्या ग्रामीण भागात परिस्थिती आणखी थोडी गंभीर आहे. याठिकाणी केवळ 5 हजार डोस शिल्लक असल्याची माहिती समोर येते आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात कोव्हिशिल्ड लसीचे एकूण 1,23,600 डोस आले आहेत. यापैकी महानगरपालिकेकडे 18 ते 19 हजार आणि ग्रामीण भागात 5 हजार डोस शिल्लक आहेत.

नागपूरमध्ये सोमवारी सलग सहाव्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांची आकडेवारी 1000 पेक्षा जास्त होती. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती याठिकाणी चिंताजनक आहे. सोमवार अखेरीस नागपूरमध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 11 हजार 76  इतकी झाली होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 9, 2021, 7:38 AM IST

ताज्या बातम्या